Mumbai: दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी लालपरी सज्ज

आगामी दिवाळी सण आणि येणाऱ्या सलग सुट्ट्यांत पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांकरिता लालपरी परत एकदा सज्ज झाली
Mumbai: दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी लालपरी सज्ज
Mumbai: दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी लालपरी सज्जSaam Tv

मुंबई : आगामी दिवाळी सण आणि येणाऱ्या सलग सुट्ट्यांत पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांकरिता लालपरी परत एकदा सज्ज झाली आहे. महाराष्ट्रात पर्यटन स्थळांच्या भेटीकरिता जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरिता लालपरी महामंडळाने राज्यभरात आगारातून रोज सुमारे १ हजार जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या काळात या जादा लालपऱ्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती देतानाच या जादा गाडया आरक्षणासाठी उपलब्ध होणार आहेत.

हे देखील पहा-

प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रवाशी महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळांना भेट देत असतात, तर अनेक जण आपापल्या गावी जात असतात. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी लालपरीच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. मागीलवर्षी राज्यावर असलेले कोरोनाचे संकट बघता प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती.

यंदा लालपरी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्या व्यतिरिक्त राज्यभराच्या आगारातून रोज १ हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी बघता गाड्यांचे योग्य नियोजन करा, सर्व लालपरी सुस्थितीत ठेवा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व लालपऱ्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्यात, असे निर्देश मंत्री, ॲड. परब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

Mumbai: दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी लालपरी सज्ज
नवाब मलिकांच्या आरोपांना एनसीबीचं प्रत्युत्तर

तसेच प्रवाशांनीही प्रवासादरम्यान मास्क लावणे, सॅनिटाईजचा वापर आदी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्याकरिता लालपरी महामंडळाच्या http://public.msrtcors.com/ आणि MSRTC Mobile Reservation App या अधिकृत संकेतस्थळ व मोबाईल अँपवर आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहन लालपरी महामंडळाने केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com