क्रूझ ड्रग्ज प्रकरणी विशेष पथक करणार चौकशी; पुजा ददलानीमुळे चौकशीत अडथळा

त्यानंतर या प्रकरणात पुढे काय? करता येईल हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी कायदेतज्ञांचा सल्ला घेण्यास सुरूवात केली.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी विशेष पथक करणार चौकशी; पुजा ददलानीमुळे चौकशीत अडथळा
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी विशेष पथक करणार चौकशी; पुजा ददलानीमुळे चौकशीत अडथळाSaam Tv
Published On

मुंबई: क्रूझ ड्रग्ज प्रकरणी स्वतंत्र पंच प्रभाकर सेलच्या प्रतिज्ञापत्र आणि इतर तक्रारींनंतर, मुंबई पोलिसांनी त्यांची बारकाईने चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक (SET) स्थापन केले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र तपासा दरम्यान दुसऱ्यांदा अडथळा आला आहे. तो म्हणजे दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावल्यानंतरही शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचली नाही, त्यानंतर या प्रकरणात पुढे काय? करता येईल हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी कायदेतज्ञांचा सल्ला घेण्यास सुरूवात केली.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी विशेष पथक करणार चौकशी; पुजा ददलानीमुळे चौकशीत अडथळा
कॉक्स अँड किंग्सकडून 110 कोटी रुपयांची फसवणूक; पर्यटन क्षेत्रात मोठं नाव

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि एफआयआर नोंदवण्यासाठी पुजा ददलानी हिचा जबाब अत्यंत महत्त्वाचा आहे, सूत्रांनी सांगितले की, ददलानी यांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत आणखी वेळ मागितला आहे. तपासादरम्यान काय निष्पन्न झाले याची सर्व माहिती SIT ने मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांना दिली आहे. एसईटी आता लवकरच ददलानीला तिसरे समन्स पाठवणार असून या तिसऱ्या समन्सनंतरही ती आली नाही, तर मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई करतील. याशिवाय आज (15 नोव्हेंबर) मुंबई पोलिसांनी सॅम डिसोझा याचा जबाब नोंदवला असून आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

दरम्यान कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आपण फक्त पैसे परत करण्यासाठी गेल्याचा दावा सॅम डिसोजा याने केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर यातील मुख्य सूत्रधार के पी गोसावी आणि सुनिल पाटील असल्याचे सॅमने चौकशीत सांगितल्याचे कळते. मुंबईच्या डीसीपी झोन 1 कार्यालयात काल सॅम डिसोजाची 7 तास चौकशी करण्यात आली. आर्यनला सोडवण्यासाठी केपी गोसावीने 25 कोटींची डिल केली होती. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने हा सर्व गैरव्यवहार पुढे आणला. यात सैनविल उर्फ सॅम याचं नाव समोर आल्यानंतर सॅमने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com