एसटीच्या चालक, वाहक पदाच्या भरतीमधील उमेदवारांना शिंदे सरकारची दसऱ्यानिमित्त खास भेट

राज्य परिवहन महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
ST Corporation
ST CorporationSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) दसऱ्यानिमित्त एसटीतील २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदाच्या भरतीतील पात्र पुरूष व महिला उमेदवारांना खास भेट दिली आहे. २०१९ च्या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमदेवारांना नेमणूकीचे तर २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज देण्यात आले.

एसटी महामंडळाच्या (ST Corporation) या निर्णयामुळे भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य परिवहन महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील १४३१ पात्र उमेदवारांना यापूर्वीच नेमणूक देण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ -

मात्र, गेली दोन वर्षे कोरोना (Corona) महामारीमुळे रखडलेल्या उर्वरीत पात्र उमेदवारांच्या नेमणूकीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार मंत्रालयात आज एका छोटेखानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, तानाजी सावंत यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

पात्र उमेदवारांपैकी आज २७ पुरूष उमेदवारांना नेमणूकीचे पत्र देण्यात आले असून उर्वरीत उमेदवारांना लवकरच नेमणूक देण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महा मंडळाचे व्यवस्थपकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

महिलाही करणार एसटीचे सारथ्य -

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने राबविलेल्या भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागविले होते. यामध्ये २०३ महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून १४२ महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे.

यापैकी २२ महिला उमेदवारांना आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवापूर्व प्रक्षिणाचे पत्र देण्यात आले. ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचे सारथ्य करण्यास सज्ज होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com