...म्हणून राज ठाकरे पवारसाहेबांवर टीका करतात; सुरेखा पुणेकरांची बोचरी टीका

राज ठाकरेंचे राजकारणात काहीच आस्तिव राहिलेल नाही.
Surekha Punekar
Surekha PunekarSaam TV
Published On

पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले तसंच टीकाही केली होती. याच पार्श्वभूमीवर आथा लावणीसम्राटणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीस सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राज ठाकरेंचे राजकारणात काहीच आस्तिव राहिलं नसल्याने ते चिडून पवारसाहेबांवर (Sharad Pawar) खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. मात्र सर्व जाती समभाव एक करुन गाव खेडी एकत्र करुन राज्यात पहिलं महिला धोरण पवारसाहेबांनी राबविले आहे. आता पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर टीका करणंही राज ठाकरेंना शोभत नसल्याची बोचरी टीका सुरेखा पुणेकरांनी केली. त्या नारायणगाव येथील लावणी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या त्यावेळी बोलत होत्या.

Surekha Punekar
शरद पवार नास्तिक आहेत हे त्यांच्या कन्येने लोकसभेत सांगितलंय - राज ठाकरे

कालच्या औरंगाबाद येथील सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार हे जाती-जातींमध्ये भेद निर्माण करतायत ते पुस्तक वातचना सुद्धा लेखक कोणत्या जातीचा आहे बघतात. तसंच आपण बोलल्यापासूनच ते राष्ट्रवादींच्या सभांमधून शिवाजी महाराजांचे नावं घ्यायला सुरुवात झाली. तसंच मी शरद पवार नास्तिक आहेत हे बोलल्यावर चांगलच झोंबल. मला माहिती होतं ते मी बोललो लगेच देवाचे फोटो काढले. मात्र, त्यांच्या कन्येने लोकसभेत सांगितलं आहे की माझे वडील नास्तिक आहेत. आता यापेक्षा जास्त काय पुरावा देऊ मी' असंही राज म्हणाले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com