माॅं काली चाळीवर काेसळले भुस्खलनाचे संकट; कुटुंबांचे स्थलांतर

file photo landslide
file photo landslide
Published On

ठाणे : कळवा नजीकच्या इंदिरा नगर येथील माॅं काली चाळवर भूस्खलनाची दुर्घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तर सहा घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवशांमध्ये घबराहाट पसरली आहे.

ठाणे जिल्ह्यातील कळवा पूर्व भागातील इंदिरा नगर आहे. येथे असलेल्या माॅं काली चाळीवर शनिवारी रात्री भूस्खलन झाले अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

file photo landslide
ठाकरे- भिडे भेट : 'बंद खोलीत कोणी कुणाचे पाय धरले'; आडमांचा प्रहार

पोलिस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दल या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी रवाना झआले. ते पोहोचल्यानंतर त्यांनी मदत कार्य सुरु केले. घरांवर पडलेला मातीचा ढिगारा हटविण्यास प्रारंभ झाला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेले नाही अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान सुरक्षितता म्हणून लगतच्या घरांतील रहिवाशांना आरडीएमसी आणि अग्निशमन दलाच्या मदतीने घोलाई नगरमधील टीएमसी शाळेत हलवण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com