Shubhada Kodare Case : पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कारवाईला वेग

Shubhada Kodare Pune : पुण्यात आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारे या तरुणीची तिच्याच सहकाऱ्यांने हत्या केली होती. या हत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे.
Shubhada Kodare Case Update
Shubhada Kodare Case UpdateSaam Tv
Published On

Shubhada Kodare Case : पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शुभदाच्या सहकाऱ्याने आर्थिक वादातून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. शुभदा कोदारे हत्या प्रकरणाची नवीन अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या हत्या प्रकरणाची दखल घेतली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा अहवाल पुढील दोन दिवसांत मागवला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय निर्धारित वेळेत या घटनेचा तपास करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. पुढच्या दोन दिवसांमध्ये घटनेसंदर्भातील एफ. आय. आर. तसेच अन्य कारवाई केलेल्याचा संपूर्ण अहवाल पाठवले जावेत असे महिला आयोगाने म्हटले आहे.

Shubhada Kodare Case Update
Shubhada Kondare: बघ्यांची गर्दी, तो तिच्यावर वार करत होता; शुभदा कोदारेच्या हत्येनं सदाशिव पेठेतील 'त्या' घटनेची आठवण, काय घडलं होतं?

दरम्यान या हत्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी कृष्णा पार्किंगमध्ये शुभदावर चॉपरने वार करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. पार्किंगमध्ये हत्येचा थरार सुरु असताना आसपासचे लोक गर्दी करुन काय घडतंय ते पाहत होते. आरोपीच्या हातात धारदार चॉपर असल्याने घाबरुन शुभदाच्या मदतीसाठी पुढे गेले नाही. चॉपरच्या वारामुळे शुभदा गंभीर जखमी होते आणि जमिनीवर कोसळते. तिचा जागीच मृत्यू होतो. शुभदा जमिनीवर कोसळल्यावर आरोपी कृष्णा चॉपर खाली टाकतो.

आर्थिक वादातून कृष्णा कनोजा या सहकाऱ्याने शुभदावर चॉपरने वार केला होता. पोलिसांनी कृष्णाला अटक केली असून न्यायालयात १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुभदा कोदरे हत्याप्रकरणाप्रमाणे दोन वर्षांपूर्वी घटना पुण्यातील सदाशिव पेठेत घडली होती. तेव्हा एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करुन कोयत्याने वार करुन मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन धाडसी तरुणांनी मारेकऱ्याला अडवून तरुणीचा जीव वाचवला होता.

Shubhada Kodare Case Update
Ajit Pawar: 'तुम्हाला जमत नसेल तर पद सोडा', पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून अजित पवार कडाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com