उल्हासनगरमध्ये डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी शिवसेनेचे जन आंदोलन

डम्पिंगमुळे दुर्गंधी आणि परिसरातील घरांमध्ये जाणारे डम्पिंगचे घाणेरडे पाणी त्यामुळे येथील नागरिकांना आजारपणाला सामोरे जावे लागत आहे.
उल्हासनगरमध्ये डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी शिवसेनेचे जन आंदोलन
उल्हासनगरमध्ये डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी शिवसेनेचे जन आंदोलनअजय दुधाणे
Published On

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच भागात आकाश कॉलनी भागात असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. डम्पिंगमुळे दुर्गंधी आणि परिसरातील घरांमध्ये जाणारे डम्पिंगचे घाणेरडे पाणी त्यामुळे येथील नागरिकांना आजारपणाला सामोरे जावे लागत आहे. (ShivSena's mass agitation to close dumping ground in Ulhasnagar)

हे देखील पहा -

हे डम्पिंग बंद करण्यासाठी आंदोलनं झाली. मात्र तोडगा निघाला नसल्याने आज शिवसेनेने डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी जन आंदोलन केलं. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे आणि आमदार बाळाजी किणीकर यांनी डम्पिंग ग्राउंडजवळ रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनानंतर सुद्धा जर डम्पिंग इथून हटवले गेले नाही तर यापुढे डम्पिंगवर जाणाऱ्या गाड्या अडवल्या जातील असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी यावेळी म्हटलं.

उल्हासनगरमध्ये डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी शिवसेनेचे जन आंदोलन
आमदार चंद्रकांत पाटलांसह सत्‍ताधारी शिवसेनेचे जलसमाधी आंदोलन

यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त राजा द्यानिधी यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी शिष्टमंडळाला म्हटलं की, मलंगगड भागातील उसाटणे येथे 30 एकर जागेवर घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे, असं आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिलं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com