रश्मी पुराणिक, मुंबई
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Election 2022) तोंडावर आल्या आहेत. अशात उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यातला संघर्ष आणखी वाढत असल्याचं दिसतंय. आज, रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मुंबईच्या प्रभादेवी इथे शिवसैनिक (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते (Eknath Shinde) यांच्यात तुफान हाणामारी झाली. या सगळ्यात राड्याला आता राजकीय वळण लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात सघर्ष वाढला आहे. (Shivsena Vs Shinde News)
या प्रकरणी 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल. तर दुसरीकडे दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा देखील आरोप आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. (Political War In Mumbai)
या सगळ्या राड्यात उद्धव ठाकरे गटातील महेश सावंत यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. आमदार समाधान (सदा) सरवणकर यांना चॅलेंज देणारे महेश सावंत कोण आहेत असा प्रश्न पडतो. तर, समाधान सरवणकर यांच्या विरोधात २०१७ मध्ये महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार यांचा विजय झाला मात्र, समाधान सरवणकर यांची निवडणुकीत चांगलीच दमछाक महेश सावंत यांनी केली होती. ही निवडणुक झाल्यावर महेश सावंत पुन्हा शिवसेनेत आले. राज्यात बंडखोरीनंतर आता सदा सरवणकर हे शिंदे गटात गेले. मात्र, महेश सावंत हे शिवसेनेतच राहिले. त्यामुळे आजच्या राड्याच्या निमित्ताने महेश सावंत आणि सदा सरवणकर पुन्हा आमने सामने आले आहेत.
दरम्यान, या राड्याप्रकरणी आता 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत यांच्यासह 20 ते 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा देखील आरोप आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. एका घरगुती प्रकरणाचा वाद झाल्याचं सरवणकर यांनी सांगितलं आहे. यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत थोडक्यात बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला. मात्र, सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस चौकशीनंतर सरवणकर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. या संपूर्ण घटनेमुळे प्रभादेवी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. त्याची शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे. आमदार सदा सरवणकर यांच्याकडे लायसन्स असलेली जर पिस्तुल असेल तर त्याचे रेकॉर्ड नजीकच्या पोलीस ठाण्यात असेल. पोलिस हे रेकॉर्ड तपासतील, ज्यामध्ये सरवणकर यांच्याकडे पिस्तुल आणि किती काडतुसे आहेत याची माहिती असेल. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार सदा सरवणकर यांच्याकडे तेवढी काडतुसे असणं आवश्यक आहे. शिवाय पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढायला सुरुवात केलेली आहे. या प्रकरणात गोळीबाराचा जो आरोप केला जातोय त्यातील सत्यता पडताळण्यासाठी पुरेसे पुरावे तसेच साक्षीदार असणं आवश्यक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
दरम्यान, या सगळ्या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. दादरमध्ये झालेल्या मारहाणाची प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाला जशास तसं उत्तर द्या असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यातील वाढलेल्या राड्यांमुळे वाद विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.