Sanjay Raut Video: गुजरातमधून आलेल्यांनी शिवसेना संपवण्याचे स्पप्न पाहू नये, संजय राऊत कडाडले

Shivsena Vardhapan Din: शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना संजय राऊत यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यातील महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केली.
Sanjay Raut Video: गुजरातमधून आलेल्यांनी शिवसेना संपवण्याचे स्पप्न पाहू नये, संजय राऊत कडाडले
Sanjay RautSaam Tv

'गुजरातमधून आलेल्यांनी शिवसेना संपवण्याचे स्पप्न पाहू नये. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला कारण ते नकली आणि ढोंगी होते', अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना संजय राऊत यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यातील महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केली. सायनच्या षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम होत आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, 'ऐतिहासिक विजय करून आपण इथे आलो आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांपुढे झुकणार नाही हे मोदी आणि शहा यांना ठणकावून सांगितले आणि कृतीने सिद्धकरून दाखवले असे उद्धव ठाकरे यांच्याकडे संपूर्ण देश एक अपेक्षेने पाहत आहे. मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे. मोदी ४०० पार घेऊन येणारच. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. जन्माला येताना ते ४०० खुळखुळे घेऊन आले होते. त्या भाजपचा आणि मोदींचा साफ खुळखुळा कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केला.'

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'शिवसेना संपवायला निघाले होते. अरे शिवसेना अशी संपते काय? शिवसेना संपणार नाही. भगवान शंकराने हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला त्यातून जन्म झालेली शिवसेना हलाहाल प्राशन करून उभी आहे. अनेक हलाहाल पचवून आम्ही उभे आहोत. तुम्ही आमच्यावर कितीही प्रयोग करा ते चालणार नाहीत.' तसंच, 'आज तिथे डोममध्ये डोम कावळे जमले आहेत. डोम कावळ्यांचे संमेलन सुरू आहे. आमचा ५८ वा वाढदिवस आहे. ते अडीच आहेत. पुढच्या वर्षी अडीच वर्षे पण नसतील त्यांच्या जीवनामध्ये.', असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला आहे.

संजय राऊत यांनी यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी सांगितले की, 'शिवसेनाप्रमुखांनी वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना स्थापन केली नव्हती. या महाराष्ट्राला स्वाभिमान, अभिमान आणि राष्ट्राभिमान याचे बाळकडू पाजून असंख्य हुतात्माच्या बलिदानातून हा महाराष्ट्रत आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली. गुजरातमधून आलेल्या कोणीही शिवसेना संपवण्याचे स्पप्न पाहू नये. छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तख्तापुढे झुकवली नाही. त्याच शिवसेनेचा आणि महाराष्ट्रचा वारसा उद्धव ठाकरेंनी यांनी चालवला.'

तसंच, 'मला आश्चर्य वाटते भाजप आता धन्यवाद यात्रा काढणार आहे. ही कशासाठी महाराष्ट्राने पराभव केला त्यासाठी की नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्यासाठी काढणार आहेत. मला कळत नाही धन्यवाद यात्रा महाराष्ट्रात आणि देशात काढणार आहेत. ४०० करणार होते ते २४० च्या खाली आणून ठेवले म्हणून आभार. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मोदी नशेमध्ये आहेत. मोदी ब्रँड आता राहिला नाही. आभारयात्रा कसली तुम्ही हारलाय. तुमचा पराभव झालाय. तुम्हाला महाराष्ट्राने लाथाडले आहे.', अशी टीका संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे.

संजय राऊत यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'महाराष्ट्र, उत्तर प्रदेशने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला कारण ते नकली आणि ढोंगी होते. वाराणसी, अयोध्येत, चित्रकुट, नाशिकमध्ये हारले. जिथे राम तिथे त्यांचा पराभव झाला. हे यांचं हिंदुत्व आहे. ही पैशाची मस्ती चालणार नाही. त्यांनी मतं कशी विकत घेतली, विजय विकत घेतला, सगळं विकत घेतलं. आता वारकऱ्यांना विकत घेतले आहे.', अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com