Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यानंतरचा शिवसेनेचा प्लॅन समोर

ठाण्यातील टेंभी नाका येथे संध्याकाळी जाहीर पार पडणार आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्याकडे जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे. ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, रश्मी ठाकरे यांचं नवरात्रीतील शक्तीप्रदर्शन याद्वारे एकनाथ शिंदेंना ठाण्यात शह देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून सुरु आहे. मात्र आता थेट उद्धव ठाकरे स्वत: ठाण्याच सभा घेणार आहेत.

Uddhav Thackeray
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी मदत करणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

दसरा मेळाव्यानंतर (Dasara Melava 2022) शिवसेनेचा पुढील प्लॅन समोर आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात 9 ऑक्टोबरला सभा घेणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथे संध्याकाळी जाहीर पार पडणार आहेत. या सभेनंतर राज्यभरात शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
शिवीगाळ केलीच नाही, माझ्या विरोधात खोटा FIR; भुजबळांनी लिहलं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

महाप्रबोधन यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे राज्यातील प्रमूख शहरात भाषण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनेच होणार आहे.

मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कात होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी येथे पार पडणार आहे.

शिवसेनेतील बंडानंतर दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. दोन्ही गटांनी यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com