...तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल; घटनातज्ज्ञ उल्हास बापट काय म्हणाले? वाचा...

पक्षांत्तरबंदी कायद्याखाली जर 16 आमदारांचं निलंबन झालं तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होईल असं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Political Crisis Supreme Court
Maharashtra Political Crisis Supreme CourtSaam TV
Published On

Shivsena Political Crisis : शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? 16 आमदार पात्र की अपात्र? अशा याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. घटनापीठासमोर सुरू असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. अशातच या सत्तासंघर्षावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत मांडलं आहे. पक्षांत्तरबंदी कायद्याखाली जर 16 आमदारांचं निलंबन झालं तर महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होईल असं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political Crisis Supreme Court)

Maharashtra Political Crisis Supreme Court
एकनाथ शिंदे कोणत्या हक्काने निवडणूक आयोगाकडे गेले? सुप्रीम कोर्टाची विचारणा

काय म्हणाले उल्हास बापट?

16 आमदारांच्या निलंबनाबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, 'एखाद्या पक्षातील दोन तृतीअंशी आमदार जर बाहेर पडले तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करता येत नाही. इथं मुद्दा असा आहे की हे दोन तृतीअंशी आमदार एकाचवेळी बाहेर पडले नाही. सुरूवातीला 16 आमदार बाहेर पडले. त्यानंतर एक-एक करत इतर आमदार बाहेर पडले', हा घोडेबाजार लोकशाहीसाठी खूप घातक आहे असं बापट यांनी म्हटलं आहे.

'पहिले 16 आमदार जे पक्षाबाहेर गेले, ते दोन तृतीअंश आमदार नव्हते. त्यामुळे त्यांचं निलंबन झालं पाहिजे असं माझं व्यक्तीगत मत आहे. पुन्हा 2003 साली जी घटनादुरूस्ती केली. त्यानुसार पक्षांत्तरबंदी कायद्याखाली जर निलंबन झालं, तर त्याठिकाणी मंत्री राहता येत नाही. इतर ठिकाणी जर निलंबन झालं तर मंत्री राहता येतं. 6 महिन्यांच्या आत निवडणून आलं तर चालतं'. असं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. (Supreme Court Judgement Today Live)

Maharashtra Political Crisis Supreme Court
Shivsena : निकाल आमच्या बाजूने लागला तर काय होणार? ठाकरे गटाची कोर्टात विचारणा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

पक्षांत्तर बंदी कायद्याखाली जर 16 आमदारांचं निलंबन झालं तर ते मंत्री राहणार नाही. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीच राहिले नाही तर हे सरकार पडतं. म्हणजेच काय तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

उल्हास बापट यांचं सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी क्लिक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com