"राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही, पण..." भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं रोखठोक उत्तर

सावरकरांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam tv news
Published On

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजप, शिंदे गट आक्रमक झाला आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल (Swatantryaveer Sawarkar) आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
सावरकरांवरील आक्षेपार्ह विधान राहुल गांधींना भोवणार? सावरकरांचे नातू तक्रार दाखल करणार

उद्धव ठाकरे पुढे म्हणले की, सावरकरांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यवीरांप्रमाणे आधी वागायला शिका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सावरकरांना भारतरत्न का दिलं नाही?

ज्यांच्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्याशी काहीच संबंध नाही, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारु नये. त्यांनी सावरकरांबद्दल प्रेम व्यक्त करणे हास्यास्पद आहे. सावकरकांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. एवढी वर्ष सत्तेत आहेत मग सावरकरांना भाजपने भारतरत्न का दिलं नाही. आठ वर्ष ते सत्तेत आहेत. केंद्र सरकारला काही अधिकार असतात. भारतरत्न देण्याचा अधिकार पूर्ण पंतप्रधानांचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray
ढोंगी प्रेम दाखवू नका, सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मेहबुबा मुफ्तीसोबत तुम्ही गेले, ते कसं चाललं. त्यामुळे आमच्या भूमिका विचारण्याआधी तुम्ही तुमची कुंडची चेक करा. लोकांना संभ्रमित करण्यापेक्षा आपल्या महापुरुषांनी जो त्याग करुन स्वातंत्र्य मिळवलंय ते टिकवण्यासाठी प्रयत्न करावा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना टिकेल की नाही अशी स्थिती आज देशात आहे. त्याच्या विरोधात एकत्र याव लागेल. संजय राऊतांना बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकलं, हे स्वतंत्र आहे का? स्वतंत्र टिकवण्यासाठी आमच्यासोबत जे येतील आम्ही देखील त्यांच्यासोबत जाऊ, अशी स्पष्टोक्ती उद्धव ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com