महापालिका निवडणुकांमध्ये युवासेनेची सरशी, नव्या दमाचे नवे उमेदवार !

मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये अनेक नवे चेहरे या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवताना या वेळी कदाचित पाहायला मिळू शकणार आहेत.
महापालिका निवडणुकांमध्ये युवासेनेची सरशी, नव्या दमाचे नवे उमेदवार !
महापालिका निवडणुकांमध्ये युवासेनेची सरशी, नव्या दमाचे नवे उमेदवार !SaamTvNews

-- रश्मी पुराणिक

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये अनेक नवे चेहरे या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवताना या वेळी कदाचित पाहायला मिळू शकणार आहेत. येत्या काही काळात त्या संदर्भातील विचार शिवसेना (Shivsena) आणि युवा सेनेकडून (YuvaSena) केला जाण्याची शक्यता आहे. सध्या असलेल्या नगरसेवक वगळता इतर ठिकाणी शिवसेनेकडून या संदर्भातील चाचपणी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हे देखील पहा :

यात युवासेनेच्या सक्रिय काम करणाऱ्या आणि त्या विभागात शिवसेना वगळता इतर पक्षाचे नगरसेवक सध्या आहेत, अश्या जागांवर युवासेनेकडून विचार केला जात आहे. यातील काही जगणावर युवासेनेच्या सक्रियपणे कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची नावं देखील प्रामुख्याने पुढे येत आहेत.

युवा सेनेतील तरुण चेहरे :

हर्षदा कारकर - दहिसर वेस्ट

अंकित सुनील प्रभू - गोरेगाव ईस्ट

रुपेश नाडकर - कुरार व्हिलेज

निखिल यशवन्त जाधव - भायखळा , माजगाव

प्रथमेश पांडुरंग सकपाळ - मुंबादेवी

दुर्गा भोसले - पेडररोड

मयुर कांबळे धरावी किंवा दादर पूर्व

पवन जाधव - नायगाव, शिवडी

राजोल संजय पाटील - भांडुप

सुप्रदा फातर्फेकर - मानखुर्द

साईनाथ दुर्गे - माहीम

राहुल कणाल - वांद्रे ईस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com