Shivsena: नरेंद्र मोदींचं नाणं खोटं ठरलं...; उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर सडकून टीका

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाशिवाय भाजपला पर्याय नाही - ठाकरे
pm narendra modi, uddhav thackeray, Shivsena On BJP
pm narendra modi, uddhav thackeray, Shivsena On BJPSaam Tv
Published On

निवृत्ती बाबर -

मुंबई: शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे आता शिवसेनेच्या ठाकरे, शिंदे या दोन्ही गटांच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या गटाची महत्वाची बैठक मातोश्री या निवासस्थानी बालोवली होती.

या बैठकीत त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी महत्वाच्या विषयांवरती चर्चा करत भाजपवर सडकून टीका केली. तसंच आपल्यासाठी ही शेवटची आणि मोठी लढाई असून ती आपल्याला जिंकायचीच आहे. ही लढाई जिंकल्यावर महाराष्ट्रात कोणीही आपल्यासमोर टिकू शकणार नाही असा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ -

आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाणं खोटं ठरलं आहे. हे नाणं घासून घासून वापरलं जातं आहे. त्यामुळेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने युतीसाठी आपल्याकडे यावं लागलं.

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाशिवाय भाजपला पर्याय नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते आपले नाव पुसण्याचा प्रयत्न करत असून याआधीही माझा स्वतःचा भाऊ आणि बाळासाहेब ठाकरेंच्या काही जवळच्या विश्वासूंनी आपला विश्वासघात केला. पण आपन त्या सर्वांचा पराभव केला, त्यांना पुरुन उरलो असा टोला देखील त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि नारायण राणेंना लगावला.

pm narendra modi, uddhav thackeray, Shivsena On BJP
Shivsena: उद्धव ठाकरेंकडून 'त्रिशूळ'सह तीन चिन्ह सादर; पण त्यापैकी एकही मिळणार नाही; कारण...

शिवाय आत्ताची लढाई ही आपल्यासाठी शेवटची आणि मोठी लढाई असून ती आपल्याला जिंकायची आहे. मग महाराष्ट्रात कोणीही आपल्यासमोर टिकू शकणार नाही असा विश्वास देखील त्यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.

त्यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा सर्व परिस्थिला सामोरं जाण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजता समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com