Yakub Memon: पेंग्विन सेनेने कबर बचाव अभियान सुरू करावं; भाजपची शिवसेनेवर बोचरी टीका

'मेमनच्या फाशीला विरोध करणारे पालकमंत्री आणि ठाकरेंचा आशीर्वाद मिळाल्यावर याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण होणारच.'
Shivsena Vs BJP
Shivsena Vs BJPSaam Tv

सुशांत सावंत -

मुंबई: याकूब मेमनच्या कबरीवरुन भाजपने आता शिवसेनेवर हल्लाबोल सुरु केला आहे. राज्यात आणि मुंबई पालिकेत यांची सत्ता असताना तुम्ही दाऊदचे प्रचारक म्हणून काम करायचा का? सत्तेत असताना शिवसेनेत (Shivsena) दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहीले होते.

सत्तेतील शिवसेना विरोधीपक्षात गेल्यावर, मात्र आता ते दाऊदचे प्रचारक झाले आहेत. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात, महाराष्ट्रात, मुंबईत बाँम्बस्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्या दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव ठाकरे यांनी कशी दिली? असा प्रश्न उपस्थित करत मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Shivsena Vs BJP
Yakub Memon: कबर वादावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, देशाला काळिमा फासणाऱ्या...

मैदाने, उद्याने, स्मशानभूमींचे सुशोभिकरण, देखभाल, दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करताय? पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरू करावं अशी बोचरी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

याकूब मेमनच्या (Yakub Memon) फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होते. ते सांगायचे की, आदित्य ठाकरे आपले भाऊ आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम झाले आणि उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला, तर याकूबच्या कबरीचे सौंदर्य करणं होणार ना?

तुम्ही 25 वर्ष सत्तेत बसलात, महापौर तुमचा तरी ही याची खबर कशी नाही मिळाली? ही जबाबदारी तुमचीच आहे. माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते ना मग आता ही कबर उखडून दाखवा. तुकडे तुकडे गॅंगच्या दबावाखाली हे केले आहे.

पाहा व्हिडीओ -

अफजल तेरे कातील जिंदा है हम शर्मिनदा है, असे हे तुकडे तुकडे गॅंग म्हणाले आहेत. नवाब मलिक, अस्लम शेख, आणि तुकडे-तुकडे गँगला खूश करण्यासाठी करण्यात आले आहे. याकूबला जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर याकूबच्या फाशीच्या कारवाई झाली अस्लम शेखने विरोध केला होता हे विसरून चालणार नसल्याचंगही ते म्हणाले.

एका सामान्य शिवसैनिकाला आता मुख्यमंत्रीपद मिळालं आहे त्यामुळे पेंग्विन सेनेची कोल्हेकुही सुरू आहे. जो वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडेल तोच दसरा मेळावा घेईल. शिवाजी पार्कचे मैदान कुणाला द्यावे याबाबत नियम नियमावली आहे त्यानुसार संबंधित यंत्रणा निर्णय घेतील. मात्र. ज्यांच्याकडे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सोने आहे, त्यालाच सभा घेता आली पाहिजे अंसही शेलार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com