Uddhav thackeray
Uddhav thackeray saam tv

बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रात फिरतेय; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
Published on

Uddhav Thackeray News : दसरा शिवतीर्थावरच होईल. संजय राऊत यांची रिकामी खूर्ची बघितली. त्यावर स्पष्टीकरण देतो की, ते कोणत्याही गटात गेले नाही. संजय राऊत मोडेल पण वाकणार नाही. संजय राऊत हे लढाईत सोबत आहेत. मुले पळवणारी ऐकली आहे. पण आता बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रात फिरतेय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली.

Uddhav thackeray
Shivsena Melava: शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली, भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल

गोरेगावच्या नेस्को सभागृहामध्ये आज शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पहिल्यांदाच जाहीर सभेमध्ये बोलत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

'व्यासपीठावर संजय राऊत यांची रिकामी खूर्ची बघितली. त्याबाबत खुलासा करतो. नाहीतर कोणाला वाटेल की, ते मिंदे गटात गेले. संजय राऊत हे मोडेन पण वाकणारी नाही. संजय राऊत हे लढाईत सोबत आहेत. मुले पळवणारी टोळी ऐकली आहे. पण आता बाप पळवणारी महाराष्ट्रात फिरतेय, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

Uddhav thackeray
Shivsena Melava Live: यंदाचा दसरा मेळावा शीवतीर्थावरच; उद्धव ठाकरेंची घोषणा

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'मुंबईवर गिधाडे फिरू लागली. त्यांना मुंबई गिळायची आहे. तुम्ही गिळून देणार का ? हे नवीन नाही. आम्ही छत्रपतींचा इतिहास वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत. त्यावेळी इतिहासात अनेक शाह स्वराजावर चालून आले होते. त्याच कुळातील अमित शाह'.

'अमित शाह म्हणाले की मुंबईत शिवसेनेला जमीन दाखवू असे बोलून गेले. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही. निवडणूका आल्यावर मुंबई दिसते, मुंबई संकटात असताना गिधाडे कुठे असतात ? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com