मुंबई : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेची अनेक वर्षांची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यातही शिंदे गटाने खोडा घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यावरून आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्याबाबत मुंबई महापालिकेला शिवाजी पार्कच्या मैदानासाठी अर्ज केला आहे. शिवसेनेने अर्ज केल्यानंतर महापालिकेने हात आखडते केले आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यावरून सुरू झालेल्या राजकारणावर माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'दसरा मेळाव्याबाबत महापालिकेला भूमिका स्पष्ट करावीच लागेल. शिवसेना कुणाची हे न्यायालयात ठरेलच, त्याच्याशी महापालिकेशी संबंध नाही. त्यामुळे उगाच दबावाखाली येऊ नये'. तसेच त्यांनी रडीचा खेळण्याचा प्रयत्न होऊ नये. दसरा मेळाव्याला ५६ वर्षांची परंपरा आहे. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणारच'. आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांनी लवकरच योग्य निर्णय घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, पेडणेकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपांवरही भाष्य केलं. पेडणेकर म्हणाल्या, 'किरीट सोमय्या हे अनिल परबांवर आरोप करत आहेत. मग त्यांनी भावना गवळी, यशवंत जाधव यांचं काय केलं ते देखील सांगा'.
पेडणकेर यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांचाही खरपूस समाचार घेतला. 'आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यापूर्वी लक्षात घ्या, आदित्य तळपता सूर्य आहे. संदीप देशपांडेंना वाटत असेल बेस्टमध्ये भ्रष्टाचार झाला तर सनदी अधिकारी आहेत. त्यांच्याकडे जा. ज्यात त्या भ्रष्टाचार दिसणाऱ्यांना 'सौ चुहे खाके, बिल्ली चली हज',अशा शब्दात त्यांनी देशपांडेंना टोला लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.