shivsena leader sanjay raut slams to modi government
shivsena leader sanjay raut slams to modi governmentSaam Tv

संपूर्ण देश विकला अजून काय पाहिजे? राऊतांची मोदी सरकारवर बोचरी टीका

Sanjay Raut Slams Modi Government: मोदी सरकारने अनेक सार्वजनिक उपक्रमांपासून ते विमानतळ सगळंच विकलेलं आहे. त्यातून तुम्ही शेतकऱ्यांना का पैसे देत नाही? - राऊत

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. संपूर्ण देश विकला अजून काय पाहिजे? आमच्या गरिबांच्या खात्यावरती 15 लाख रुपये टाकणार होता त्याचं काय झालं असा सवाल राऊतांनी (Sanjay Raut) उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना पक्षवाढीसाठीही त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. (shivsena leader sanjay raut slams to modi government)

हे देखील पहा -

राऊत म्हणाले की, विदर्भात जर पक्ष वाढवायचा असेल, शिवसेना वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजे. नागपूर उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे. एकेकाळी शिवसेनेची ताकद तिथे चांगली होती. नागपूरला आदित्य ठाकरे सुद्धा जाणार आहे. शासकीय कामासाठी तेव्हा ते सुद्धा पक्षासंदर्भात काही भूमिका घेतील. अनेक जिल्ह्यांमध्ये नव्याने कार्य सुरू झालेलं आहे. लवकरच उद्धव ठाकरेसुद्धा पक्षकार्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात स्वतः लक्ष घालत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते संपूर्ण राजाकडे पाहतात. पण अनेक संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देणे गरजेचे आहे आणि आम्ही ते द्यायला सुरुवात केली आहे असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात उद्रेक घडविण्याचा प्रयत्न

एसटी संपाबाबत राऊत म्हणाले की, सरकारने कठोर कारवाई केल्यानंतर एसटी संप जवळ-जवळ सुटलेला आहे. कोणीतरी महाराष्ट्रमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कामगारांना हाताशी पकडून कुठली तरी अज्ञात शक्ती ही कामगारांना भडकावून मुंबईसह महाराष्ट्रात उद्रेक घडविण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते शरद पवार यांच्या घरावर चाल करून गेले आणि तिथेच ठिणगी पडली. कठोर कारवाई करून यांचे नेतृत्व करणारी लोक होते असामाजिक तत्त्वं यांना काही राजकीय शक्तींचे पाठबळ होते ते सगळे तुरूंगात गेलेत. जवळ- जवळ 80 हजार कामगार आता कामावर पोहोचलेत आणि लालपरी धावू लागली असं राऊत म्हणाले.

मोदी सरकारवर टीका

संजय राऊतांनी मोदी सरकारवर (Modi Government) बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की, मोदी सरकारने अनेक सार्वजनिक उपक्रमांपासून ते विमानतळ सगळंच विकलेलं आहे. त्यातून तुम्ही शेतकऱ्यांना का पैसे देत नाही? असा सवाल त्यांनी विचारला. पुढे ते म्हणाले की, मोदी सरकारने आपल्या मर्जीतल्या दोन उद्योगपतींना अख्खा देश विकला आहे. राहुल गांधी म्हणतात ते सत्य आहे. संपूर्ण देशा विकला अजून काय पाहिजे? आमच्या गरिबांच्या खात्यावरती 15 लाख रुपये टाकणार होता इतर आणि तुमच्या योजना होत्या. तुम्ही हा देश जवळ-जवळ विकत आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

shivsena leader sanjay raut slams to modi government
कुलूप तोडून हॉटेलमधून लांबविला दारूसाठा; दोघांना अटक, दारू हस्तगत

आयएनएस विक्रांत घोटाळा

आयएनएस विक्रांत घोटाळ्याबाबत राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांत हा मोठा घोटाळा आहे. त्यांच्या पैई-पैई चा हिशोब बाहेर आला पाहिजे. आमच्या हवेतल्या गोळ्या नाहीत. आम्ही पुराव्यांसोबत बोललो. मित्रांसाठी कोट्यावधी रुपये गोळा केलेले राजभवनात पोचले नाहीत. जर ते कोणत्या कोणाच्या खिशात गेले, जमीनीत गेलेत, या प्रत्येक गोष्टींचा हिशोब अंतरिम जामीनावर सुटलेल्या आरोपींना द्यावा लागेल अशी टीका त्यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com