मुंबई : भाजपप्रणित एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांनी विनंती केली होती. शिवसेना खासदार हे भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा न दिल्यास बंडाळीच्या तयारी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. या पाठिंब्यामुळे खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर आता शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Aditya Thackeray News In Marathi )
आदित्य ठाकरे म्हणाले, ' शिवसेनेनं नेहमी योग्य भूमिका मांडलेली आहे. याआधी प्रतिभा पाटील यांना सुद्धा पाठिंबा दिला होता. एक आदिवासी महिला या पदावर जात आहेत. भाजपसोबत राजकीय वाद आहेत. ते आहेतच. मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली हे ठीक आहे. आपल्या लोकांचा आवाज ऐकायचा असतो. त्यात संजय राऊत नाराज असल्याच्या या बातम्या तुम्ही पसरवल्या'.
'शिवसैनिक पक्ष प्रमुखांच्या पाठीशी आहेत. ही प्रेम यात्रा आहे. लोकांना भेटत आहोत. कोणावर आरोप करत नाही. दुःख हे आहे की, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. महाराष्ट्राचं नाव मोठं होत आहे ही पोट दुखी होती. म्हणून गद्दारी झाली', असे ते म्हणाले.
शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तो भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची अनेकवेळा वेगळी भूमिका असते. त्यांच्या भूमिकेवर भाष्य करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.