Shivsena : शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू; अरविंद सावंत यांचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेची पायमल्ली सुरू आहे. संविधानाला पायदळी तुडवत जाण्याची घटना घडत असल्यामुळे लोकांनी उभं राहायला हवं, असा आवाहन खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला.
Arvind Sawant News, Shivsena News
Arvind Sawant News, Shivsena Newssaam tv

सुमित सावंत

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेची पायमल्ली सुरू आहे. संविधानाला पायदळी तुडवत जाण्याची घटना घडत असल्यामुळे लोकांनी उभं राहायला हवं, असा आवाहन खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केलं. आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ( Shivsena Political Crisis News In Marathi )

Arvind Sawant News, Shivsena News
Eknath Shinde : ...तर मी गावाला शेती करायला जाईन; विधानसभेत मुख्यमंत्र्यांंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना (Shivsena) गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, त्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर शिवसेनेने बैठकांचा सपाटा लावला आहे. या बैठकीला शिवसेना नेते अनिल देसाई, सुभाष देसाई, दिवाकर रावते, विनायक राऊत , अंबादास दानवे आदी उपस्थित होते. तसेच राज्यभरातून जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. शिवसेनेने आयोजित केलेल्या बैठकीत खासदार अरविंद सावंत यांनी देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.

Arvind Sawant News, Shivsena News
'एकनाथ शिंदेंच्या घरावर दगडफेक करणारा जन्माला आला नाही'

अरविंद सावंत म्हणाले,'शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेची पायमल्ली सुरू आहे. संविधानाला पायदळी तुडवत जाण्याची घटना घडत असल्यामुळे लोकांनी उभं राहायला हवं. ऑक्टोबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे यांची निवड उद्धव ठाकरे यांनी केली होती. गट नेता २०१९ साली निवडला होता. तर प्रतोदही उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी प्रभू यांना निवडलं होतं. मग प्रतोद कसा बदलू शकतो. मग व्हिप त्यांचा सुनील प्रभू यांचा लागू होणार'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com