BBD Chawl Redevelopment: राष्ट्रवादीने शिवसेनेला डावललं? सेना नगरसेविकेची खदखद

BBD Chawl Redevelopment: कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्याने शिवसेना नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
Jitendra Awhad & Urmila Panchal at BBD Chawl
Jitendra Awhad & Urmila Panchal at BBD ChawlSaam Tv Digital
Published On

मुंबई: मुंबईतील बीबीडी चाळीच्या पुनर्विकासाचा नारळ आज नायगांव येथे फुटला. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत नायगांव येथील '५ ब' ही पहिली इमारत निष्कासित करण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र या कार्यक्रमाला स्थानिक शिवसेना (Shivsena) नगरसेविका उर्मिला उल्हास पांचाळ (Urmila Panchal) यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. त्यामुळे बीबीडी चाळीच्या (BBD Chawl Mumbai) पुनर्विकासाच्या कार्यक्रमात शिवसेनेलला डावललं गेलं का? असा प्रश्न उपस्थित होतोय. (Mumbai BBD chawl latest news in Marathi)

हे देखील पहा -

बीबीडी चाळीच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्याने शिवसेना नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यावेळी आव्हाड यांनी जमलेल्या लोकांसमोरच उर्मिला पाचांळ यांना हात जोडत दिलगिरी व्यक्त केली. मात्र ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्याच पक्षाच्या स्थानिक नगरसेविकेला निमंत्रण द्यायला गृहनिर्माण खात्याला विसर पडला की, जाणून - बुजून शिवसेनेला निमंत्रण देण्याचं राष्ट्रवादीने टाळलं? अशी शंका निर्माण होतेय.

इंग्रजांचे कारागृह ते गिरणी कामगारांचं नंदनवन असा प्रवास या चाळींनी अनुभवला आहे. या इमारतींना १०० वर्ष होत आली होती. सध्या नायगावात या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. १९९५ च्या युती सरकारच्या काळापासून या चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या या कामाला सुरुवात होत आहे. तर दुसरीकडे वरळी बीडीडी (BBD Chawl Latest News) मधील रहिवशांना निष्काशनाबाबत नोटीस आल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे बीडीडी पुनर्वसन बाबत दोन वेगळ्या भूमिका समोर येत आहे. (Shiv Sena disappointed not to get invitation for BBD Chawl redevelopment program)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com