शिवसेनेची 'डिनर डिप्लोमसी'; उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक, काय असेल रणनीती?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. रणनीती काय असेल, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray SAAM TV

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून झाडल्या जात आहेत. भाजप-शिवसेना वाद टोकाला पोहोचला असतानाच, आता शिवसेनेच्या 'डिनर डिप्लोमसी'ची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी उद्या, शुक्रवारी संध्याकाळी ही बैठक होणार आहे. शिवसेनेची पुढची रणनीती काय असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray
केंद्राविरोधात पुण्यात महाविकासआघाडीसह डाव्या संघटनांचा एल्गार, मोठ्या सभेचं आयोजन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी उद्या, शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता सर्व खासदारांची बैठक होणार आहे. शिवसंपर्क अभियानासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. दुसरीकडे, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष तीव्र झाला असून, केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली होती. आता पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात या बैठकीविषयी चर्चा सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीचा वाद; अजित पवारांनी केंद्राला ठणकावलं, म्हणाले...

उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे. शिवसेनेचे सर्व खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि शिवसेनेत संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. राज्यात आणि केंद्रात शिवसेना खासदारांची काय भूमिका असली पाहिजे, याबाबत मुख्यमंत्री ठाकरे स्वतः खासदारांना मार्गदर्शन करणार असल्याचे कळते. याशिवाय भाजप आणि केंद्राच्या भूमिकेबाबत रणनीतीही ठरवली जाणार असल्याचे कळते. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com