पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीचा वाद; अजित पवारांनी केंद्राला ठणकावलं, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा असं वक्तव्य केलं होतं.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा असं वक्तव्य केलं होतं. पंतप्रधानांच्या या वक्तव्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. GST परतावा केंद्राकडून येणे बाकी असून पेट्रोल डिझेल कर कमी करण्यासदर्भात पंतप्रधान म्हणाले, मात्र आम्ही कोणताही कर वाढवला नाही. कराबाबत एकमताने निर्णय घेण्यात येतात. आज मुख्यमंत्री आम्हाला सांगतील कालच्या VC मध्ये काय झालं. आज आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करू आणि मग का एक्शन घ्यायची हे ठरवू असं अजित पवार यांनी आज पकारांशी बोलताना सांगितलं.

तसंच GST चा परतावा लकवरच येईल हे अपेक्षित असून देशात बाहेरून इंधन येते त्यावर पहिलं केंद्रसरकार कर लावते. मग राज्य लावत असते. केंद्रानेही आपला कर कमी करावा त्यांना खूप अधिकार आहे प्रत्येक वेळी राज्यावर ढकलू नये. तसंच राज्यातून खूप टॅक्स केंद्राला मिळतो त्यामानाने आपल्याला निधी मिळत नाही. केंद्र सरकारने जर राज्यांनी इतकाच टॅक्स लावावा, असा निर्णय घेतला तर तो लावता येईल. पण राज्याची स्थिती आणि कर वसुली पाहता परतावा ही तेवढा व्हायला हवा असही पवार म्हणाले.

Ajit Pawar
समृद्धी महामार्गावरील अपघातांना 'ब्रेक' लागेना; आधी कमान आता गर्डर कोसळला

दरम्यान, भाजपनेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राष्ट्रवादी युतीबाबत केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले, २०१७ सालीच आशिष शेलार यांनी सांगायचे होते, पाच वर्ष का थांबला? आपण २०२२ मध्ये आहोत आता त्यावेळचं का सांगत आहात, तसंच आता यामध्ये कोणाला रस नाही असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com