Pune: शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली

बँकेतील आर्थिक व्यवहारातील रक्कम 72 कोटींवरून 436 कोटींवर
Shivajirao Bhosle Bank
Shivajirao Bhosle BankSaam Tv
Published On

पुणे - शिवाजीराव भोसले बँकेच्या (Shivajirao Bhosle Bank) आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे पोलिसांनी (Police) केलेल्या तपासामध्ये समोर आले. बँकेतील आर्थिक व्यवहारातील रक्कम 72 कोटींवरून 436 कोटींवर गेल्याची माहिती सोमार आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार 436 कोटींवर गेला आहे.

हे देखील पहा -

सहकार खात्याच्या चाचणी लेखा परीक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेकडून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आला आहे. लेखा परिक्षणामध्ये संचालक, बँक अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराबाबत गंभीर आक्षेप नोंदवले गेले आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी या आधीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Shivajirao Bhosle Bank
Navi Mumbai पोलिसांची गुटखा विरोधात मोठी कारवाई, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त

तत्कालीन अध्यक्ष, सर्व संचालक, कर्जदार, कर्ज अधीक्षक, CEO, शाखा व्यवस्थापकच्या संगनमताने 436 कोटी 55 लाखाचा गैरव्यवहार केल्याचा अहवालात आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 82 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार अनिल भोसले, संचालक सूर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, चीफ अकाउन्टंट शैलेश भोसले हे अटकेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com