Balaji Kinikar On Sanjay Raut Spit : 'सेनेची भाकरी खाऊन राष्ट्रवादीची चाकरी करणारा माणूस'; किणीकरांची राऊतांवर टीका

आज राज्यभरातील शिवसैनिक संजय राऊत यांचा निषेध नाेंदवत आहेत.
Mla Balaji Kinikar , MP Sanjay Raut, Ambernath, Shivsena, MP Dr. Shrikant Shinde
Mla Balaji Kinikar , MP Sanjay Raut, Ambernath, Shivsena, MP Dr. Shrikant Shindesaam tv

Ambernath News : अंबरनाथ येथे शिवसेनेने खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांच्या प्रतिकात्मक फोटोला जाेडे माराे आंदाेलन (aandolan) छेडले. माध्यमांनी खासदार श्रीकांत शिंदे (mp shrikant shinde) यांच्या विषयी प्रश्न विचारला असताना खासदार राऊत थुंकले. त्यांच्या या कृतीवर (sanjay raut spitting) शिवसेना (shivsena) आक्रमक झाली आहे. राज्यभरात सेनेचे कार्यकर्ते राऊत यांच्या विराेधात आंदाेलन छेडू लागलेत. (Maharashtra News)

Mla Balaji Kinikar , MP Sanjay Raut, Ambernath, Shivsena, MP Dr. Shrikant Shinde
VishalGad News : शिवप्रेमींनाे ! विशाळगडाबाबत पुरातत्त्व विभागानं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या

संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच राऊत हे चक्क थुंकले होते. हा प्रकार अतिशय असभ्य आणि राजकीय आचारसंहितेत न बसणारा असल्याची टीका यानंतर होऊनही राऊत यांनी माफी मागितली नव्हती.

त्यामुळं आज अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. संजय राऊत हा शिवसेनेची भाकरी खाऊन राष्ट्रवादीची चाकरी करणारा माणूस असल्याची टीका यावेळी शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली.

Mla Balaji Kinikar , MP Sanjay Raut, Ambernath, Shivsena, MP Dr. Shrikant Shinde
SSC Result 2023 : वयाच्या ५४ व्या वर्षी दहावीत मिळविले ५४ टक्के, वाचा भगत आजींची Success Story

अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनाला शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, शैलेश भोईर, वनिता वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com