लोकसभा गट नेतेपदी श्रीकांत शिंदेंची निवड, शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत निर्णय
Shrikant Shinde was elected as the Lok Sabha group leader of Shiv SenaSaam Tv

Shrikant Shinde: लोकसभा गट नेतेपदी श्रीकांत शिंदेंची निवड, शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत निर्णय

Shiv Sena News: आज शिवसेना संसदीय समितीची बैठक पार पडली. यात लोकसभा गट नेतेपदी श्रीकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना लोकसभा गट नेतेपदी कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आलीय. आज झालेल्या शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेना लोकसभा गटनेता निवडीसाठी संसदीय समिती सदस्य खासदार श्रीरंग बारणे यांनी डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी अनुमोदन दिले.

लोकसभा गट नेतेपदी श्रीकांत शिंदेंची निवड, शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत निर्णय
Maharashtra Politics 2024 : महाविकास आघाडी विधानसभेत एकत्र लढणार का?; काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेना लोकसभा गट नेता निवड प्रक्रिया ही शिवसेना पक्षांतर्गत करण्यात आली आहे. लोकसभा सभापती यांची निवड झाल्यानंतर शिवसेना लोकसभा गट नेते पदाची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

दिल्लीत सत्तेसाठी वाटाघाटी

दरम्यान, सत्तास्थापनेसाठी भाजपला खात्यांमध्ये तडजोड करावी लागणार असल्याची माहिती मिळतेय. आज दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली. यात कोणाला किती मंत्रिपद मिळावं, यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. यातच एकनाथ शिंदेंना 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपद, तर अजित पवार गटाला 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

लोकसभा गट नेतेपदी श्रीकांत शिंदेंची निवड, शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत निर्णय
Sangli MP Vishal Patil: उद्धव ठाकरे आमच्या वडिलांसमान, ते समजून घेतील : खासदार विशाल पाटील

पण या यादीत नेमकी कुणाची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आलीय. तर चंद्रबाबू नायडूंना 3 कॅबिनेट आणि नितीश कुमार यांना 2 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com