Dombivli Adulteration Milk: डोंबिवलीत दुधात भेसळ; शिवसेना पदाधिकाऱ्याने केला भांडाफोड

Dombivli News: टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एकाला अटक
Dombivli Adulteration Milk
Dombivli Adulteration MilkSaam TV

अभिजीत देशमुख

Dombivli News Today: डोंबिवली पूर्वेकडील टेम्पो नाका परिसरात एका इमारतीमध्ये बंद दाराआड दुधात पाणी टाकून भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना पदाधिकारी महेश पाटील यांनी उघडकीस आणला आहे. दुधात पाणी टाकून हे भेसळयुक्त दूध तो विक्री करत होता. याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी रमेश वणपती याला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Dombivli Adulteration Milk
Jalana Crime News: किरकोळ कारणावरून वाद! दोन गटात तुफान हाणामारी; महिलेसह ५ जण गंभीर जखमी

डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील जिमखाना रोडवरील टेम्पो नाका परिसरातील मोहन प्लाझा बिल्डिंगमध्ये दुधात भेसळ होत असल्याची माहिती शिवसेनेचे (Shivsena) तालुका प्रमुख महेश पाटील यांना मिळाली होती. महेश पाटील यांनी पहाटे ५ च्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला असता नामांकित कंपनीच्या दुधात पाणी टाकून भेसळ करत असल्याचे दिसून आले.

Dombivli Adulteration Milk
Rajasthan High Court: व्यक्तिमत्व आणि शारीरिक रचनेनुसार प्रत्येकाला लिंग बदलण्याचा अधिकार; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

महेश पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती टिळकनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुधात भेसळ करणाऱ्या रमेश वणपती याला ताब्यात घेतले. त्याकडे अधिक चौकशी असता रमेश हा मागील ३ महिन्यात दुधात (Milk) भेसळकरून विक्री करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सदर जागेवरून भेसळयुक्त दूध हस्तगत केले असून रमेश वणपती विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com