"आशिष शेलार मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा शिवसैनिक सोडणार नाहीत"

'आशिष शेलार आता पातळी सोडून बोलायला लागलेत मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द काढाल तर शिवसैनिक सोडणार नाहीत.'
 Ashish Shelar
Ashish Shelar Saam TV
Published On

मुंबई : राम भक्तांवर ठाकरे सरकारचा काय राग आहे कळत नाही असं म्हणत जेव्हा-जेव्हा हिंदू सण येतो त्याला परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का? अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

त्यांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आशिषजी, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा शिवसैनिक सोडणार नाही, असा इशाराच मनिषा कायंदे यांनी दिला आहे. शेलार यांनी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी आक्रमक झाल्या आहेत.

 Ashish Shelar
BJP Mumbai: "हिंदुंच्या सणाला परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का?"- आशिष शेलार सरकारवर बरसले

आशिष शेलार आता पातळी सोडून बोलायला लागलेत मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द काढाल तर शिवसैनिक सोडणार नाहीत, सत्ता गेलेय म्हणून एवढं वैफल्यग्रस्त होऊ नका असं म्हणतच तुमच्या मेंदुला लकवा मारला आहे का असही त्या म्हणाल्या. तसंच 'आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाहीत असा इशारा मनिषा कायंदे यांनी शेलारांना दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com