शिरुरचे खासदार हरवले! खासदारांना शोधा अन् रोख बक्षीस मिळवा

या फलकांवर खासदारांच्या नावाने १०० रूपयांचे बक्षीसही जाहिर करण्यात आले आहे.
शिरुरचे खासदार हरवले! खासदारांना शोधा अन् रोख बक्षीस मिळवा
शिरुरचे खासदार हरवले! खासदारांना शोधा अन् रोख बक्षीस मिळवारोहिदास गाडगे

शिरूर - तालुक्यातील रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांनी आता थेट शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंना लक्ष करत फ्लेक्सबाजी केली. शिरुरचे खासदार हरवले! खासदारांना शोधा रोख बक्षीस मिळवा, या फलकाने सध्या शिरूर तालुक्यातील पाबळ-केंदूर-चौफुला ते वढु बुद्रुक या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

संभाजी महाराजांच्या नावाने मते मागून निवडून आलात, पण संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्याला निधी आणला नाहीत, असे म्हणत वढु बुद्रुक रस्त्यावरील खड्ड्यांच्या परिसरात लावलेल्या या फलकांवर खासदारांच्या नावाने १०० रूपयांचे बक्षीसही जाहिर करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

शिरुर-तालुक्यातील सर्वात दुर्लक्षित आणि तितकाच सर्वाधिक चर्चेचा रस्ता म्हणजे कोरेगाव भिमा-वढु बुद्रुक-केंदूर-पाबळ हा रास्ता आहे. गेली अनेक वर्षापासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या मार्गावरील रस्त्यांवर पडलेले खड्डे वर्षानुवर्षं तसेच राहिल्याने खड्डे अजुनच वाढले आहे. अनेक वेळा तक्रारी करुन न्याय मिळत नसल्याने नागरिकांनी या खड्ड्यांना शिरुरच्या खासदारांना जबाबदार धरले आहे.

फलकावरील संपूर्ण मजकुराचा रोख खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर असला तरी त्यांच्या थेट कुठेही उल्लेख केला नाही. विशेष म्हणजे हा फ्लेक्सवरील मजुर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे लक्ष वेधण्यासाठी आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दिवसागणिक अपघातांची मालिका सुरु असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहे.

शिरुरचे खासदार हरवले! खासदारांना शोधा अन् रोख बक्षीस मिळवा
Dhule : नगरसेविकेसह नागरीकांचा आयुक्‍त कार्यालयाबाहेर ठिय्या

सध्या पीएमआरडीए मधून या रस्त्यासाठी सध्या ६ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु यात फक्त ९०० मीटरचाच रस्ता होत असल्याने, प्रत्यक्षात वढू ते कोरेगाव हे अंतर तीन किलोमीटर असल्याने संपूर्ण रस्त्याचे काम करावे तसेच पुढे केंदूर येथे कान्होराज महाराजांची समाधी पाबळ येथे प्रसिद्ध जैन मंदिर या सारखे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र येथे असल्याने हा संपूर्ण रस्ता करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या या रोषाशाचा सामना कोल्हे कसा करणार हेच पहावे लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com