रश्मी पुराणिक
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भरपूर वेळेस वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहेत. यंदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याने परत नव्या काँट्रोव्हर्सीला जन्म मिळाला आहे. 'समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?' असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारींनी औरंगाबाद मधील एका कार्यक्रमात काल केले आहे. (Sharing video Sharad Pawar Supriya Sule reply Governor)
पहा व्हिडिओ-
या विधानावर त्यांच्यावर काहींनी टीका करायला सुरुवात केली आहे. या दरम्यान, शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामुळे चर्चांना आणखी उधाणं आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं...रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या.
हे देखील पहा-
शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी... त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती, त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविले अशी लेखणीची कमालकृत्ये केली.आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे.
ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले.” असे सूचक ट्विट सुप्रिया सुळेंनी केला आहे. या विधानानंतर त्यांच्यावर काहींनी टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे चर्चांना आणखी उधाणं आलंय.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.