भूषण शिंदे -
मुंबई: युवासेना प्रमुख, शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात झाली. आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथील शाखा क्र. २१६ ला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर बोलताना आजारपणाचा फायदा घेत घात केला अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. तसंच शरद पवारांनी शिवसेना संपवली अशा हास्यास्पद प्रतिक्रिया कोणी देत असतील तर त्या गोष्टींकड लक्ष देऊ नये असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना आदित्य (Aditya Thackeray) म्हणाले, 'जे कोणी मातोश्रीवर येत आहेत त्यांची निष्ठा आम्हाला कळतेय. महाराष्ट्रातील सगळे नागरिक उद्धव साहेबांसोबत (Uddhav Thackeray) उभे आहेत. त्यांनी जो काही आम्हाला धोका दिला आहे त्याबद्दल दुःख नक्कीच आहे. त्यांच्या चेहर्यावरील भाव पाहून मी असेल किंवा उद्धवसाहेब असतील आमच्या सारख्या चांगल्या लोकांना राजकारणात जागा आहे का? हा प्रश्न आता पडला आहे. हे दुर्दैव असल्याचंही ठाकरे या वेळी म्हणाले.
पाहा व्हिडीओ -
तसंच आम्ही जेव्हा जागोजागी फिरतो तेव्हा लोक येऊन भेटतात तेव्हा कळते की मागील दोन-अडीच वर्षात जे काही काम झाले ते जनतेनं पाहिले आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकला ज्यांना आम्ही सर्व काही दिले आणि त्यांनीच आम्हाला धोका दिला. कुठे काय जोडायचे त्याला तुम्हीच पहा; पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की देशात लोकशाही आता राहिली आहे का? अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
मतदारांनी पक्षाचे चिन्ह पाहून मतदान केले. त्यामुळे मतदारांनी निवडून आणलेले हे आमदार फुटले तर देशात लोकशाही राहिली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. असं आमदारांना पळवून घ्यायला लागले तर देशात लोकशाही जिवंत राहिल का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केल अशा हास्यास्पद प्रतिक्रिया कोणी देत असतील तर त्या गोष्टींकड लक्ष देऊ नये. जे काही घडले ते राज्याने नाही तर संपूर्ण देशाने आणि लोकांनी पाहिले की कसे लोकशाहीच्या विरोधात पावले उचलली गेली अशी प्रतिक्रिया त्यांनी शरद पवारांवर केले जाणाऱ्या आरोपांवरती आज दिली.
माझी निष्ठा यात्राही महाराष्ट्र प्रत्येक कोपऱ्यात जाणार आहे आणि ही निष्ठा यात्रा (Nishtha Yatra) कोणाच्याही विरोधात नाही. त्यांचे आमच्यावर जे काही प्रेम आहे ते पाहतोच आहोत आणि म्हणून त्यांनी कदाचित धोका दिला असेल. उद्धव साहेबांच्या सर्जरीचा गैरफायदा घेऊन त्यांनी हा धोका दिला आणि म्हणून पुन्हा सांगतो हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा.
आता जे गेले ते माजी नगरसेवक आहेत आणि आता जे बनतील ते शिवसेनेचे नगरसेवक असतील असा इशाराच त्यांनी फुटीर नगरसेवकांना दिला. तसंच आम्ही कोणावरही टार्गेट करत नाही आहोत आमची कामाची पद्धत नाहीच आणि आम्ही समाजकारण जास्त केले म्हणून कदाचित असा धोका झाला असेल.आज उद्धवजींनी सांगितले की आमच्या घराचे दरवाजे खुले आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.