Sharad pawar
Sharad pawar saam tv

शिंदे सरकार पाच-सहा महिने टिकेल, मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा : शरद पवार

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात भाजपप्रणित शिंदे सरकार विराजमान झालं आहे. राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन तीन दिवस झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
Published on

रश्मी पुराणिक

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सत्तेवर स्वार झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात भाजपप्रणित शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झालं आहे. राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन तीन दिवस झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. 'राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा', असं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. (Sharad Pawar Latest news In Marathi)

Sharad pawar
अमरावतीची घटना म्हणजे महाविकास आघाडीचं पाप, खासदार अनिल बोंडेंचा घणाघात

आज, रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीतर्फे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित होत्या. त्यावेळी शरद पवारांनी आमदारांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले,राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आता विरोधी बाकावर बसणार असलो, तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना स्पष्ट होईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यवर्ती निवडणुका लागतील. त्यामुळे त्याची तयारी आतापासून करा'.

Sharad pawar
व्हीप विरोधात मतदान केलेल्या आमदारांना अपात्र ठरवा; शिवसेनेची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

'शिंदे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का याबाबत प्रश्न आहे. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात जाऊन काम करत राहा. मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर त्याची तयारी असावी. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्यावे, असेही शरद पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार, जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये जसं मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतं तसंच विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं असतं. आता याच विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com