Sharad Pawar Retirement: अजित पवारांमुळे शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेतला का? जवळच्या व्यक्तीने सांगितली 'आतली' गोष्ट

Sharad Pawar News: 'शरद पवार यांनी भावनिकतेून कधीच निर्णय घेतला नाही, असं म्हणत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न मणियार यांनी केला.
Sharad Pawar decided to step down as NCP president
Sharad Pawar decided to step down as NCP presidentsaam tv

Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे. शरद पवारांनी यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याच्या निर्णयानंतर अजित पवारांमुळे त्यांनी निर्णय घेतला अशी चर्चा सुरू आहे.

या चर्चेवर शरद पवारांच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार विठ्ठल मणियार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. 'शरद पवार यांनी भावनिकतेून कधीच निर्णय घेतला नाही, असं म्हणत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न मणियार यांनी केला. (Latest Marathi News)

शरद पवारांच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार विठ्ठल मणियार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांवर भाष्य केलं. अजित पवार यांच्या नाराजी नाट्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा दिला, या चर्चेवर भाष्य करताना विठ्ठल मणियार म्हणाले, 'अजिबात नाही. आतापर्यंत अनेक समस्यांना तोंड दिलेलं आहे. केवळ तोंडच दिलं नसून सर्व विषय चांगल्या प्रकारे हाताळले आहेत'.

Sharad Pawar decided to step down as NCP president
Devendra Fadnavis on Sharad Pawar: शरद पवारांच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...

'गेल्या वर्षभरात मानसिक तणावही आले असतील, शरद पवार देखील व्यक्ती आहेत. मात्र, समस्यांना तोंड देऊन त्यांचं मन घट्ट झालं आहे . समस्यांना तोंड कंस देता येईल, याचा सकारात्मकदृष्टीने ते विचार करतात. शरद पवार यांनी भावनिकतेून कधीच निर्णय घेतला नाही. उद्या शरद पवार राजकीय प्रचाराला देखील जाऊ शकतात', असेही ते पुढे म्हणाले.

विठ्ठल मणियार म्हणाले, 'शरद पवार यांना तोंडाचा वर्षभरात पुन्हा दुसऱ्यांदा त्रास झाला. त्यातूनही ते बरे झाले. मात्र, त्यांना वयामानानुसार ताण येत होता आणि येत आहे. या ताणातून त्यांना विश्रांती मिळावी. त्यांनी आता सामाजिक कामावर लक्ष द्यावं. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी राजकारणात माणसं तयार केली आहेत. त्यांनी तयार केलेले माणसं मंत्री राहिले आहेत. मुख्यमंत्री मात्र त्यांच्या पक्षाचे राहिलेले नाहीत. राष्ट्रवादीची दुसरी पळी त्यांनी तयार केली आहे. त्यांनी पक्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची क्षमता असणारे माणसं तयार केली आहेत'.

'शरद पवार यांच्यानंतर पक्षात दुसरा अध्यक्ष होऊ शकतो. मात्र, त्यांची इतर अध्यक्ष व्यक्तीसोबत तुलना होऊ शकत नाही. याचा अर्थ असा नाही, की ते राष्ट्रवादी पक्ष चालवू शकत नाही. आता साहेबांनी कुठंतरी थांबलं पाहीजे, असं आम्हाला वाटत होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रात लक्ष द्यायला हवं, असेही मणियार म्हणाले.

'शरद पवार यांनी हा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. लोकांसाठी हा धक्कादायक निर्णय आहे. त्यांनी आधीच सांगितलं होतं की, मी निवृत्त होणार नाही. काही ना काही कार्य करण्याची त्यांची वृत्ती आहे. अशी माझी खात्री आहे, असे मणियार पुढे म्हणाले.

Sharad Pawar decided to step down as NCP president
Sharad Pawar Resigns: शरद पवार यांच्या निर्णयाचे राज्यभर पडसाद! कार्यकर्ते उतरले रस्त्यावर; २ जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

'राजकारणात कधीतरी बाजूला व्हावं लागेल, त्यानंतर नव्या माणसाला पदावर बसवण्यासाठी फार उशीर होऊ नये, यासाठी शरद पवार यांनी वेळ साधली आहे, असं मला वाटत आहे. त्यांनी हा ठरवून केलेला भाग आहे. राजकारणात असं सांगितलं जात नाही. शरद पवार यांना कधी घोषणा केल्यानंतर चर्चा होईल. क्रिकेटर सारखं पंचवीस दिवस अगोदर सांगायचं, नंतर लोकांनी त्यावर चर्चा करत बसायची. हे त्यांना आवडत देखील नाही, असे मणियार यांनी पुढे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com