Sharad Pawar News : वंचित बहुजन आघाडीची प्रत्येक तालुक्यात व्होटिंग बँक; मविआच्या लोकसभेच्या जागावाटपावर शरद पवारांचं मोठं भाष्य

Sharad Pawar Latest News In Marathi : महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याकडेही साऱ्यांचं लक्ष लागलंय. याचदरम्यान, शरद पवारांनी महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीच्या प्रस्तावावर मोठं भाष्य केलं आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam tv

Sharad Pawar News :

भाजपने काल लोकसभेची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता महाविकास आघाडीची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी कधी जाहीर करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याकडेही साऱ्यांचं लक्ष लागलंय. याचदरम्यान, शरद पवारांनी महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीच्या प्रस्तावावर मोठं भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

शरद पवारांनी बारामतीमधील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी पत्रकारांशी मनसोक्त चर्चा केली.

शरद पवार म्हणाले, बारामतीत पार पडलेल्या नमो रोजगार मेळाव्यामुळे 10 वीच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. बोर्डाचे पेपर असताना देखील विद्या प्रतिष्ठान येथे मेळावा घेणं योग्य नव्हतं. मेळावा घेण्याच्या अगोदर दहावीचं सेंटर बदलण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र परीक्षा केंद्र न बदलल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला. नमो रोजगार मेळाव्याला शासकीय प्रोटोकॉल असताना देखील माझं नाव जाणीवपूर्वक वगळले'. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar
Prakash Ambedkar : माझ्याविरोधात अकोल्यातून निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं PM नरेंद्र मोदींना खुलं आव्हान

वंचित आघाडीच्या प्रस्तावावर शरद पवार काय म्हणाले?

'वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी मी स्वतः आग्रही आहे. वंचितचा प्रत्येक तालुक्यात व्होटिंग बँक ठरलेला आहे. वंचितकडून 27 जागांवर दावा केलेला नसून, त्यांनी केवळ सहा जागांची मागणी केलेली आहे. यात आमच्या कार्यकर्त्यांचा आणि माध्यमांचा गैरसमज झालेला आहे, असे शरद पवारांनी सांगितले.

महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत येणार?

महादेव जानकर यांच्याविषयी शरद पवार म्हणाले, ' महादेव जानकर यांच्या सोबत चर्चा झाली असून, त्यांना देखील आमच्यात सहभागी करून घेण्यासाठी मी आग्रही आहे'. शरद पवारांच्या वक्तव्यामुळे माढा मतदारसंघ महादेव जानकरांना दिला जाण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar
Samruddhi Mahamarg : मुंबईतून शिर्डीला अवघ्या 1 तासात पोहचता येणार; उद्या होणार समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण

शरद पवारांची नमो रोजगार मेळाव्यावर टीका

'नमो रोजगार मिळाव्यातून बऱ्यापैकी हाउसकीपिंग सारख्या नोकऱ्या देऊन युवकांची राज्य सरकारच्या माध्यमातून फसवणूक झालेली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची उद्या बैठक होणार असून, या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित असतील. यातून जागा वाटपाबाबत योग्य ते चर्चा केली जाईल, अशी माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com