Maharashtra Political news: दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. 'अजितदादांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. आतापर्यंत शरद पवार नावाचं कवचकुंडल त्यांच्याकडे होतं. मात्र हेच कवचकुंडल काढून अजित पवारांनी मोठी चूक केली, अशा शब्दात शालिनी पाटील यांनी सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शालिनी पाटील यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली.
अजित पवारांवर टीका करताना शालिनी पाटील म्हणाल्या, 'मुख्यमंत्री होण्यासाठी काही गुणवत्ता लागते. तुम्ही काय करून दाखवलं. लोकांना काय सांगणार. तुम्ही राष्ट्रवादी पक्षातून काम केलं आहे. तुम्ही स्वत: काय केलंय. तुम्हाला सर्व पदे राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाली. माझ्या विचाराच्या मागे २५ हजार कुटुंबे आहेत. त्याचबरोबर मी ४४ कारखान्याच्या संपर्कात आहेत. हे सर्व प्रश्न जिवंत ठेवेल. ज्याचा कारखाना त्याला मिळाला पाहिजे'.
'विठ्ठलराव विखे पाटील हे बैठकीला यायचे, त्यावेळी सोबत त्यांची भाजी भाकरीही घेऊन यायचे. तुम्ही त्यांच्या पाया पडण्याच्या योग्यतेचेही नाहीत. तुम्ही बँकेचा घोटाळा केला. शरद पवारांनी त्यांच्यावरील संकट अंगावर घेतलं, त्यांना संकटातून बाजूला केलं. अजित पवारांबद्दल आम्ही ऐकून घेत नाही, असा घणाघात शालिनी पाटील यांनी केला.
'अजित पवारांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. ते अविचारी वागले आहेत. काकांचं कवचकुंडल त्यांनी काढून टाकलं आहे. त्यांचं समाजासाठी योगदान नाही. त्यांनी जे केलं सर्व उजेडात येणार आहे. त्यामुळे त्यांना आगामी काळात कोण मुख्यमंत्री करतील,हा प्रश्न आहे,अशीही टीका शालिनी पाटील यांनी केली.
शालिनी पाटील यांनी यावेळी छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका करताना पवारांनी वसंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका केली होती. त्यावरून शालिनी पाटील म्हणाल्या, 'तुम्ही सत्ता केवळ स्वत:ची मालमत्ता बनविण्यासाठी भोगली. त्याच्याशिवाय तुम्ही काही केलं नाही. तुम्ही लोकांच्या नावावर जगला आहात'. शालिनी पाटील यांच्या टीकेनंतर अजित पवार आणि छगन भुजबळ काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.