मनमानी शुल्क विरोधात शाळकरी विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली नसून त्यांना शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण होत आहे.
मनमानी शुल्क विरोधात शाळकरी विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन
मनमानी शुल्क विरोधात शाळकरी विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलनचेतन इंगळे
Published On

मीरा-भाईंदर: शहरात खासगी शाळांकडून राबविण्यात येत असलेल्या मनमानी कारभाराविरोधात शालेय मुलांकडून पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शाळेकडून ऑनलाईन शिक्षण (Online Class) प्रणालीत समाविष्ट न करणे, आर्थिक शुल्क आकारणी करणे असे आरोप विध्यार्थी व पालक यांच्याकडून करण्यात आले. (School children sit in front of the corporation headquarters against arbitrary fees)

हे देखील पहा -

कोरोनामुळे (corona) लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी (Lockdown) निर्णयाने अनेक नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले होते. त्यामुळे बऱ्याच नागरीकांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण जात होते. खासगी शाळेकडून (Private School) आकारण्यात येत असलेल्या अधिक शुक्ल (Fees) आकारणी कमी करावी म्हणून खुद्द उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत आदेश दिले होते. आता टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली नसून त्यांना शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण होत आहे.

मनमानी शुल्क विरोधात शाळकरी विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन
समीर वानखेडे म्हणाले, "माझ्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही" !

अशा परिस्थितीत मिरारोड येथील खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना शुल्क भरणी सक्तीची करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेत तसेच ऑनलाईन वर्गात समाविष्ट करण्यात येत नसल्याची तक्रार समोर आली आहे. तर पालक मासिक पद्धतीने शुल्क भरण्यास तयार असतानादेखील शाळेकडून लक्ष देण्यात नसून स्थानिक प्रशासन अशा शाळांना सहकार्य करत असल्याचा आरोप पालकांनकडून करणयात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com