Pune News: कोरोनामुळे नागरिक मृत्यूशी झूंज देत असताना पुण्यात 'रॅपिड अॅंटीजन किट'मध्ये ९० लाखांचा घोटाळा; धक्कादायक प्रकार उघडकीस

याची माहिती कोणाला कळू नये यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाइल नंबर यावर देण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले आहे.
Pune News
Pune NewsSaam TV
Published On

Pune News: कोरोना काळात तपासणीसाठी मिळणाऱ्या 'रॅपिड अॅंटीजन किट' बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील वारजे येथील महापालिकेच्या डॉ. अरविंद बारटक्के दवाखान्यात ८० ते ९० लाखांचा घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. वारजे माळवाडी पोलिसांनी या संदर्भात तपास करत महापालिकेला पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. सदर रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळसुरे यांनी हा प्रकार उघकीस आणत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अरविंद बारटक्के दवाखान्यात कोरोनाची तपासणी करण्यासाठी पालिकेकडून पुरवलेले 'रॅपिड अॅंटीजन किट' ६० ते ८० टक्के रुग्णांसाठी न वापरता त्याची विक्री केली आहे. यात ११ हजारांहून अधिक बोगस रुग्णांची नोंद आढळली आहे. हे किट घेतलेल्या रुग्णाच्या मोबाइल नंबरवर एक मॅसेज पाठवला जातो. त्यामुळे याची माहिती कोणाला कळू नये यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाइल नंबर यावर देण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले आहे.

तक्रारदार आणि पोलिसांनी केलेल्या तपासानुसार सदर घोटाळ्यात वारजे कर्वेकर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे, महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, तेव्हाचे कंत्राटी स्वॅब सेंटर प्रमुख डॉ. ऋषिकेश गारडी यांचा हात असल्याचे म्हटले जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या काळात हा घोटाळा झाला आहे.

Pune News
Pune : पोलिसांनी झेंडे घेतले ताब्यात, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार, या काळात बारटक्के दवाखाण्यात १८ हजार ५०० रॅपिड तपासणीच्या नोंदी आहेत. मात्र यातील ११ हजार ३२४ नोंदी बोगस असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी एका रॅपिड किटची किंमत ३०० रुपये होती. त्यानुसार एकूण ३३ लाख ९७ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे समजते. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या काळात २३ कर्मचाऱ्यांचे मोबाइल नंबर यासाठी वापरले गेल्याचे म्हटले आहे.

Pune News
Satara Pune Highway : साता-याहून पुण्याला जाणा-या वाहतूकीच्या मार्गात ३१ डिसेंबरपर्यंत माेठा बदल; जाणून घ्या कारण

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी या बाबत व्यवस्थीत चौकशी करून पोलिसांत तक्रार दाखल करावी असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि आरोग्यप्रमुखांना पत्राद्वारे कळवले होते. मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रीया न आल्याचे वारजे वरिष्ठ पोलिस (Police) निरीक्षक डी. एस. हाके यांनी म्हटले आहे. कोरोनाकाळात दुसऱ्या लाटेत हा प्रकार घडला आहे. यामध्ये नागरिक जीवन मरणाच्या दारात असताना हा प्रकार घडल्याने पुण्यातील (Pune) नागरिकांनी देखील महापालिकेतील आरोग्य खात्याच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com