SBI Interest Rate Hike : एसबीआयच्या ग्राहकांना दणका; कर्जे महागली, EMI वाढणार

SBI Loan Interest Rate Hike : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कोट्यवधी ग्राहकांना मोठा दणका दिला आहे.
SBI Interest Rate Hike
SBI Interest Rate HikeSAAM TV

SBI Loan Interest Rate Hike : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कोट्यवधी ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. बँकेने आपल्या एका वर्षाच्या मुदतीसाठीच्या कर्जावरील एमसीएलआर (MCLR) म्हणजेच मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेकडून कर्जे घेणे महागणार आहे.

बँकेचे नवे दर १५ जानेवारीपासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी एमसीएलआर वाढवले आहेत.

SBI Interest Rate Hike
RBI Repo Rate Hike: कर्जे महाग होणार, तुमचा EMI वाढेल; RBI कडून रेपो दरात वाढ

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने आपल्या १ वर्षाच्या एमसीएलआरमध्ये १० बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. एमसीएलआरमधील ही वाढ फक्त एका वर्षाच्या मुदतीसाठी करण्यात आली आहे.

एका वर्षासाठी एमसीएलआरमध्ये वाढ होऊन ८.४० टक्के झाले आहे. ओव्हरनाइट एमसीएलआर ७.८५ टक्के, १ आणि ३ महिन्यांच्या मुदतीसाठीचं एमसीएलआर ८ टक्के, ६ महिने - ८.३० टक्के आणि दोन वर्षांसाठी एमसीएलआर ८.५० टक्के, तसेच ३ वर्षासाठी एमसीएलआर ८.६० टक्के इतकी आहे.

SBI Interest Rate Hike
Youth Farmer Bank : शेतकऱ्याच्या पोरांचा नादखुळा! नोकरीचा नाद सोडून दोघांनी अख्खी बँक उभारली, कोट्यवधींची उलाढाल

EMI वाढेल

एमसीएलआरमधील वाढीसोबतच टर्म लोनवरील इएमआय वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश ग्राहकांची कर्जे एका वर्षाच्या एमसीएलआरच्या आधारे असतात. अशात एमसीएलआरमधील वाढीमुळे वैयक्तिक कर्जे (पर्सनल लोन), वाहन आणि गृह कर्जे महाग होतील.

MCLR म्हणजे काय?

MCLR ही भारतीय रीझर्व्ह बँकेद्वारे विकसित केलेली एक पद्धत आहे. त्याआधारे बँक कर्जांवरील व्याजदर निश्चित करत असते. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे व्याजदर निश्चित करत होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com