Pune News:विद्यार्थ्यांच्या जेवणात आळ्या, काच, प्लास्टिक देणारी सावित्री संस्था काळ्या यादीत; अखेर तीन महिन्यांनी संस्थेवर कारवाई

या संस्थेमार्फत शालेय पोषण आहार पुरवल्या जाणाऱ्या १३ शाळांमध्ये यापुढे इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनमार्फत शालेय पोषण आहार पुरवण्यात येणार
Pune News
Pune NewsSaam TV

Pune News:पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात पुरवल्या जाणाऱ्या खिचडीमध्ये काचा, प्लास्टिकचे तुकडे आणि अळ्या आढळून आल्या होत्या. मात्र, तरीही अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न करता अशा संस्थेला पाठिशी घातल्याचा गंभीर प्रकार समोर आला. मात्र आता या प्रकरणी अखेर संबधित संस्थेला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका शाळांमध्ये 'सावित्री बचत गट' नावाच्या संस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या खिचडीमध्ये चक्क केस, अळ्यांसह काचेचा, प्लास्टिकचा तुकडा आढळून आल्याची गंभीर बाब घडली होती. या संस्थेच्या शालेय पोषण आहाराबाबत वेगवेगळ्या सात शाळांमधून वारंवार शिक्षण विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी संबधित संस्थेवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Pune News
MPSC STUDENT: त्या १११ उमेदवारांचं भवितव्य टांगणीला? पाहा नेमकं काय आहे प्रकरण

त्याप्रमाणे अखेर सावित्री महिला स्वयंरोजगार नावाच्या या संस्थेवर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. या संस्थेला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश शिक्षण (Education) विभागामार्फत काढण्यात आलेत. तसेच, या संस्थेमार्फत शालेय पोषण आहार पुरवल्या जाणाऱ्या १३ शाळांमध्ये यापुढे इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनमार्फत शालेय पोषण आहार पुरवण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

Pune News
School Bus Catches Fire At Virar : भीषण आगीत स्कूल बस जळून खाक; विरारमधील घटना

३ महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

सावित्री संस्थेमार्फत सुरु असलेल्या या प्रकारावर २५ ऑगस्ट २०२२ रोजी पहिली तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर अनेक शाळेतील मुख्यध्यापकांनी सावित्री संस्थेविरोधात तक्रारी दाखल केल्या. मात्र कोणीही याची दखल घेण्यास तयार नव्हते. कस्पटे वस्ती, मोहनगर लिलाबाई खिवंसरा शाळा, ३९ क्रमांक प्राथमिक शाळा, सावित्रीबाई फुले शाळा अशा अनेक शाळांनी (School) या संदर्भात तक्रार दाखल केली होती. अशात तीन महिन्यांनी अखेर सावित्री संस्थेला चपराक बसली आहे. या संस्थेला ब्लॅक लिस्टमध्ये टकण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com