Sanjay Raut: सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादानंतर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले; 'शिवसेना ही…'

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv

Mumbai: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मागील तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. याप्रकरणी आता युक्तिवाद पूर्ण झाला असून हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

दरम्यान, यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut
Political News : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

काय म्हणाले संजय राऊत..

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी ”सर्वोच्च न्यायालयात आमच्या वकिलांनी ठामपणे बाजू मांडली. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अजूनही या देशात न्याय जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदसदविवेकबुद्धीवर आमचा विश्वास आहे. रामशास्री बाण्याचे न्यायमूर्ती या व्यवस्थेत आहेत, म्हणून न्यायालय जिवंत आहे.अशी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. हेच या महाराष्ट्राचं सत्य आहे आणि या सत्याचा विजय नक्कीच होईल असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

Sanjay Raut
Shirdi News : साईभक्तांसाठी गुडन्यूजची 'हॅटट्रिक! शिर्डीत नाईट लँडिंगची परवानगी, अनेकांची काकडआरतीची इच्छा पूर्ण होणार

निवडणूक लढवण्यास तयार....

त्याचबरोबर "शिवसेना कोणाची याचा निर्णय जनता घेईल, उद्या जरी न्यायालयाने निवडणुका लढण्याचा आदेश दिला तरी आम्ही लढायला तयार आहोत, हा निकाल भविष्यासाठी महत्वाचा आहे," असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

भाजपवर साधला निशाणा..

त्याचबरोबर यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजवर निशाणा साधला. ज्यामध्ये त्यांनी "भारतीय जनता पक्षाचे आणि फुटीर गटाचे लोक सांगतायत निकाल आमच्या बाजूने लागणार, हा आत्मविश्वास येतो कुठून?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी "गल्लोगल्ली शिवजयंती साजरी ही शिवसेनेकडून केले जाते भाजपला आता आठवण झाली आहे, निवडणुक आली स्वार्थ आला तर त्यांना महाराज आठवतात," अशी टीकाही भाजपवर (BJP) केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com