Sanjay Raut News: भांग पिऊन सत्तेवर बसलेल्यांची भांग कसबा निवडणुकीत उतरली; संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Sanjay Raut Tweet: महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे.
Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Devendra Fadnavis Vs Sanjay RautSaam TV
Published On

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भांग पिऊन सत्तेत आलेल्यांचाी भांग उतरली की सत्ता जाईल. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आमच्या काही मित्रांना मागच्या काळात कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती. कुणी गाणं म्हणत होतं, कुणी रडत होतं अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं की,

महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले सगळ्यांना माहिती आहे. भांग उतरली की त्यांची सत्ता नक्कीच जाईल.

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Ravindra Dhangekar News: रविंद्र धंगेकर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला; राज ठाकरेंचीही भेट घेणार?

आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत. महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे आणि त्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो ट्वीट करत म्हटलं की, विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा सुद्धा नशेचा अतिरेक आहे. बांधावर पिकं आडवी झाली. शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं. ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय? असा सवाल राऊतांनी विचारला.

देशातील परिस्थिती आणि राज्यातील परिस्थिती एकच आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आम्ही या लोकांना घाबरत नाही. अतिशय बेकायदेशीरपणे नाव आणि चिन्ह काढून घेतलं तरी शिवसैनिक लढतो आहे. काल सुद्धा लालू यादव यांच्यावर धाडी पडल्या पण गौतम अदानींना नोटीस पण बजावली नाही. धाडी कोणावर टाकताय विरोधी पक्षावर, जे चुकीचे आहे. त्यांच्याविरोधात आम्ही उभे राहणार, असंही संजय राऊतांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com