तपास यंत्रणांच्या छाप्यात नावं समोर येतील की घुसवली जातील? राऊतांचा प्रश्न

तपास यंत्रणा राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी काम करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. मात्र या कारवाईत नेत्यांची नावं आहेत की ती नावं मुद्दाम घुसवली जात आहे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv

मुंबई - संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला. दक्षिण मुंबईत आज सकाळपासून ईडी (ED) आणि एनआयएकडून (NIA) छापे टाकण्यात येत आहेत. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास शैलित तपास यंत्रणांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, राष्ट्राच्या सुरक्षे संदर्भात काही मुद्दे असतील, गंभीर मुद्दे असतील केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे. तपास यंत्रणा राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी काम करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. मात्र या कारवाईत नेत्यांची नावं आहेत की ती नावं मुद्दाम घुसवली जात आहे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.

हे देखील पहा -

तर गुजरात बँक गोटाळ्याबाबद म्हणले की, गुजरात घोडाळ्यात ईडी काही करत असल्याचे दिसत नाही. या प्रकरणाला दोन वर्षे झाले. हा घोटाळा कोण दाबत आहे यावर ईडीने तिथेही जाऊन ते लोक कोण होते, आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे कोण? याचा तपास केला पाहिजे, असे देखील ते म्हणले.

Sanjay Raut
Sindhudurg: सेना आमदार वैभव नाईकांसह काँग्रेस, भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

दरम्यान, मुंबईत सकाळपासून ईडीने छापेमारी सुरु केली आहे. दावूद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित व्यवहारांबाबत ही छापेमारी सुरु आहे. काही वेळापूर्वी ईडीचे पथक दावूदची बहिण हसिना पारकरच्या घरीही पोहोचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या धाडसत्राचे महाराष्ट्रात एका राजकीय (Political) नेत्याशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ६ संपत्तींची चौकशी ईडीच्या टीमकडून सुरू आहे. दक्षिण मुंबई परिसरात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ६ मालमत्तांची चौकशी सुरू आहे. या मालमत्तांचा संबंध काही राजकीय नेते, १९९३ बॉम्ब स्फोटात आरोपी, हसिना पारकर यांच्या संबंधात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com