मुंबई sanjay raut latest news : गाेपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खाेत यांच्या समजंस भुमिकेचे स्वागत करुन एसटी कामगारांना दिले जाणारे वेतनवाढीचे पॅकेज हे उत्तम असल्याचे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी वापरली जाणारी भाषा ही अयाेग्य असून ज्यांची लायकी नाही त्यांनी बाेलू नये असा इशारा देखील खासदार राऊत यांनी गाेपीचंद पडळकर यांचे नाव न घेता दिला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करुन संपात ताेडगा काढण्यासाठी आणि कामगारांची आर्थिक स्थिती उत्तम रहावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या पगारासाठी उत्तम पॅकेज देण्याचा निर्णय घेतला. एसटी कर्मचा-यांना सुमारे पाच हजार रुपयांपासून ते २४ हजारांची पगार वाढ मिळणार आहे. तरी देखील कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे विराेधी पक्ष हे जर संप चिघळत ठेवणार असतील तर कामगारांचे नुकसान करीत आहेत. त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करावयाचा आहे का असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.
राऊत म्हणाले राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि आम्ही सारेजण कामगारांच्या बाबतीत संवेदनशील आहाेत. महाराष्ट्र, मुंबई ही कामगारांच्या चळवळीतून उभी राहिली आहे. कष्टक-यांचे नुकासन व्हावे याचा आम्ही कधीही विचार करणार नाहीत. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना देखील कामगारांना उत्तम पॅकेज दिले जात आहे.
हे राज्य कायद्याने चालते
दरम्यान कामगार समजूतीने घेत आहेत. परंतु एक विशिष्ट वर्ग ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल वापरत असलेली भाषा अयाेग्य असल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले त्यांची (गाेपीचंद पडळकर) लायकी तरी आहे का. तुम्ही चर्चा करु शकता. परंतु ज्यांनी राजकारणात हयात घालवली आहे त्यांच्या विषयी वापरली जाणारी भाषा याेग्य नाही. हे राज्य कायद्याने चालते. हे राज्य भावनाशील पद्धतीने कार्यरत असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
समजंस भुमिकेचे स्वागत
गाेपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खाेत हे एसटी कर्मचारी संपातून बाहेर पडणार आहेत यावर या दाेन नेत्यांच्या समजंस भुमिकेचे स्वागत करताे. कूठे तरी संप चालू करणा-यांनी संप संपविण्यासाठीचा विचार करणे आवश्यक असते अन्यथा हजाराे कामगारांचे कुटुंब रस्त्यावर येतील अशी भीती खासदार राऊत यांनी व्यक्त केली.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.