"...या शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं"

अटलबिहारी वाजपेयी यांची आज जंयती देशभर साजरी होत असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे.
"...या शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं"
"...या शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं" Saam Tv

जयश्री मोरे

मुंबई : अटलबिहारी वाजपेयी (atal bihari vajpayee) यांची आज जंयती देशभर साजरी होत असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तसेच इतर नेत्यांकडून अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही अटलबिहारी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

राऊत म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्ष्यांचे देशाचे नेते होते. उत्तम संसदपटू, माणुसकी, मानवता काय असते हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य आम्हाला जवळून पाहता आलं. देशाचे नेतृत्व कसा असतं याचा परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून घेता आला.

"...या शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं"
भंडारा : रोशन खोडके हत्या प्रकरण; मेव्हण्याच्या मदतीने बहिणीने केला भावाचा खून

"हिंदुत्वाचा विचारधारेशी कधीही तडजोड न करता हा देश सर्वांचा आहे. देशाची एकात्मता कायम टिकली पाहिजे यावर भर देऊन राजकारण केलं. धर्मांधता, जातंधता या दोन शब्दांना दूर ठेवून राजकारण कसं करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं. हिंदुत्वावर भाजप शिवसेनेची युती झाली त्याला अटल बिहारी वाजपेयी यांनी मोठं योगदान दिलं. बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं.'

हे देखील पहा-

पुढे बोलत असताना राऊतांनी म्हंटल, 'देशाचे पंतप्रधान असताना एनडीएचे नेते असताना देशाच्या अनेक प्रश्नावर अटल बिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत असत. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे आजच्या भाजपाचे दोन स्तंभ आहेत. आजही अटल बिहारी वाजपेयी यांची आम्हाला सतत आठवण होते. कारगील युद्धाच्या वेळी त्यांच्या नेतृत्वाची कसोटी आम्ही पाहिली. त्याआधी पाकिस्तानसोबत प्रश्न सोडवण्यासाठी ते स्वतः बसने लाहोरला गेले होते मुशर्रफ यांना सुद्धा भेटले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होते पण राष्ट्र अभिमान कायम ठेवून त्यांनी काम केलं. त्यांचं स्मरण देशाला कायम राहील' असे राऊत म्हणाले.

पुढे ते मुंबईच्या महापौरांबद्दल म्हणाले, महापौर किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या झुंजार रणरागिनी आहे. त्या रस्त्यावर उतरून चांगलं काम करत आहेत. प्रत्येक संकटात या रस्त्यावर शिवसैनिक म्हणूनच धावतात असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com