Sanjay Raut: संजय राऊतांना अटक होणार? 'या' आमदाराचा दावा

आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest Newssaam tv
Published On

मुंबई: आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. ईडीची चौकशी अजुनही सुरू आहे. यावर आता राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे (ShivSena) बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना ईडीची भीती वाटत नाही. त्यांना आत्मविश्वास आहे, ईडीचा एवढा फौजफाटा आहे म्हटल्यावर त्यांना अटक होऊ शकते, अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.

संजय राऊत यांना ईडीची भीती वाटत नाही. ईडीने आज सकाळी एवढ्या मोठ्या फौजफाट्यासह धाड टाकली याचा अर्थ त्यांना अटक होऊ शकते. संजय राऊत काही मास लीडर नाहीत. या देशात कायद्याचे राज्य आहे. संजय राऊत यांनी काही केले असेलतर त्यांना काही होणार नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.

Sanjay Raut Latest News
पुण्यात आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक

संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊ नये. शपथ घेण्याची अधिकार फक्त आम्हाला आहे, आम्ही सेनेत ४० वर्ष काढली आहेत. शिवसेना तुम्ही काढू नका उद्धव ठाकरे एक दिवस तुम्हाला बाहेर काढतील. शरद पवार यांच्या नादाला लागून यांनी शिवसेनेची वाट लावली आहे, असा आरोपही शिरसाट यांनी केला.

Sanjay Raut Latest News
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे (ED)पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. संजय राऊत यांना गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने समन्स पाठवले होते. (Sanjay Raut Latest News)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भांडूपमधील मैत्री या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी सहकार्य न केल्याने ईडीचे पथक आता त्यांच्या घरी दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com