मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन (Wine) व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप असल्याचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यावेळी आरोप लावले आहेत. ते म्हणाले की, राऊतांच्या परिवाराने काही महिन्याअगोदर एका वाईन व्यावसायिकाबरोबर बिजनेस (Business) पार्टनरशिप केली होती. त्यांनी जाहीर करावे की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे. (Sanjay Raut in the wine business Allegations Kirit Somaiya)
हे देखील पहा-
किरीट सोमय्या यांनी माहितीनुसार, मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीबरोबर (company) राऊत (Sanjay Raut) यांची पार्टनरशीप केली आहे. यांचा व्यवसाय हॉटेल, पब, क्लबस आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय आहे. १६ एप्रिल २०२१ या दिवशी राऊत कुटुंबियांनी मॅगपीबरोबर करारावर सह्या केले आहेत. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीचे संचालक आहेत.
किरीट सोमय्या यांनी मॅगपी कंपनीविषयी अधिक माहिती देत सांगितले आहे की, मॅगपी कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. या कंपनीची उलाढाल वार्षिक १०० कोटींची आहे. कंपनीने २ जानेवारी दिवशी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरित करण्याचा असल्याचे शासनाला कळवले आहे. यानंतर राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मी थेट आरोप करत आहे, पण उत्तर कोणी देत नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर केला आहे.
इतकेच नाही तर, वैजनाथ देवस्थानची जमीन ठाकरे सरकारने हडप केली आहे. या जमिनीवर तहसीलदार वर दबाव आणत आहेत. ठाकरे सरकारचा वैजनाथ देवस्थान जमीन मध्ये थेट संबंध आहे, असा आरोप देखील सोमय्यांनी यावेळी केला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.