Sanjay Raut News: 'माझा आवाज बंद करणं मोदी-शहा यांनाही जमलं नाही; संजय राऊत पुण्यात कडाडले

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam tv
Published On

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस राज्य खड्ड्यात घालायला चालले आहेत. माझा आवाज बंद करणं मोदी-शहा यांनाही जमलं नाही. भ्रष्टाचार कोणत्या पातळीवर चालतो याच उदाहरण म्हणजे आजच सरकार, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यावर टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News)

खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत . आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्यानंतर आता राऊत यांनी दौंडमध्ये सभा घेतली. या सभेत उपस्थितांना संबोधित करताना राऊत म्हणाले, ' पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडून कसबा निवडणुकीत सर्व प्रचाराला आले होते. मोदी फक्त भ्रष्टाचारी लोकांच्या प्रचाराला जातात. भ्रष्टाचारी असल्याशिवाय भाजपमध्ये प्रवेश मिळत नाही'.

Sanjay Raut News
Rahul Gandhi News: राहुल गांधींना मोठा धक्का; गुजरातच्या हायकोर्टाच्या न्यायधीशांकडून बाजू ऐकून घेण्यास नकार

' अनेक दिवस हे माझं मागे लागले होते. पण मला तुरुंगात टाकलं होतं. मला तुरुंगात का टाकलं तर मी काहीच केलं नाही म्हणून टाकलं मी काय त्यांना मला तुमचा वॉशिंग मशीनमध्ये टाका म्हणालो नाही. मी म्हणालो घेऊन जा, असेही राऊत म्हणाले.

' माझं कोणाशी व्यक्तिगत भांडण नाही. राहुल कुलबरोबर व्यक्तिगत भांडण नाही. पन्नास हजार गुन्हे दाखल करा. हे राज्य कसलं आहे? बेकायदेशीर राज्य आहे. गेले दोन महिने गृहमंत्र्याकडे वेळ मागतोय. माझं सरकारकडे कधीच काम नसतं. मी भीमा कारखाना भंगारात जातोय यासाठी वेळ मागतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

'हे माझ्यापासून पळून जात आहेत. मी येतो म्हणाले की पळून जात आहेत. शेवटी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. सीबीआय काय करत बघू. नाहीतर ईडीकडे तक्रार दाखल करेन किंवा कोर्टात जाईन. २०२४ मध्ये आपलं सरकार येणारच आहे. केंद्रात आणि राज्यात पण येणार आहे. बघू कोण वाचवतं, असेही राऊत म्हणाले.

'४० आमदार आता सेनेतून गेले, त्यातले १२ भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. यातील प्रत्येकावर ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा आरोप आहे. तुम्ही मिस्टर कुल आहात तर मी मिस्टर हॉट आहे. सोडणार नाही. कारखाना चालवायला द्यायची गरज काय? तुम्हाला चालवता येत नसेल तर बाजूला व्हा, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut News
Maharashtra Politics: अजितदादा मुख्यमंत्री होणारच... वेट अँड वॉच..; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

'भ्रष्टाचाराला लोकांना पाठीशी घालण्याच काम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस राज्य खड्ड्यात घालायला चालले आहेत. माझा आवाज बंद करणं मोदी-शहा यांनाही जमलं नाही. भ्रष्टाचार कोणत्या पातळीवर चालतो याच उदाहरण म्हणजे आजच सरकार, अशी टीका राऊत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com