Sanjay Raut: तुमच्या भेसळीच्या रंगाला आम्ही घाबरत नाही, मविआ नेत्यांवरील छापेमारीवरुन राऊतांनी भाजपला सुनावलं

होळीच्या सणाला त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये भाजपवर टीकेची पिचकारी उडवलीये.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv

मुंबई: रेड हा त्यांचा आवडता रंग म्हणण्यापेक्षा त्यात फार भेसळ आहे. आम्ही त्या भेसळीच्या रंगाला घाबरत नाही, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे. होळीच्या सणाला त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये भाजपवर टीकेची पिचकारी उडवलीये (Sanjay Raut Criticize BJP Over Raids On Mahavikas Aghadi Leaders).

"जर भारतीय जनता पक्षाला (BJP) वाटत असेल केंद्रीय तपास यंत्रणा खोटे आरोप, चिखलफेक करुन विकास आघाडीचे खासदार, आमदार, नेते यांचे मनोबल ते खाली आणण्याचा प्रयत्न करणार असतील, तर ते चुकीचे आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले, की घाबरू नका पुन्हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही, हे केवळ राष्ट्रवादी पक्षासाठी नाही तर पूर्ण महाविकास आघाडी पक्षासाठी त्यांनी भूमिका मांडली आहे", असंही ते म्हणाले.

Sanjay Raut
Devendra Fadnavis: गोवा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है; फडणवीसांचे आव्हान

नकली रंगांवर केंद्र सरकारची बंदी - संजय राऊत

"आमचे बीजेपीतले मित्र रोज तारखा देत आहेत. रोज रंग उधळत आहेत, ते नकली रंग आहेत, अशा नकली रंगांवर केंद्र सरकारची बंदी आहे. त्यामुळे काल त्यांना पवार साहेब यांनी उत्तर दिले आहे, काही झाले तरी ते पुन्हा येणार नाहीत, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही", असं म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपला आव्हान दिलं आहे.

"रेड हा त्यांचा आवडता रंग म्हणण्यापेक्षा त्यात फार भेसळ आहे, चुकीच्या रंग ते वापरतात आणि तुमच्या त्या भेसळीच्या रंगाला आम्ही घाबरत नाही, होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोजच सुरु असतो. आम्ही जर यांचा शिमगा करायला सुरुवात केला, तर महाराष्ट्रात सुद्धा खूप खड्डे खणलेले आहेत, त्या खड्ड्यात कोण पडेल आणि कोणाला ढकलले जाईल हे तुम्हाला हळूहळू दिसेल", असा इशाराही राऊतांनी दिला.

"शिवसेना (Shivsena) हा मोठा पक्ष आहे आणि शिवसेनेचे आव्हान आहे आणि ज्याचे आव्हान आहे त्याच्या विरोधात बोंबा मारल्या जातात. भारतीय जनता पक्षाच्या दंडात ताकद आहे, असे त्यांना वाटते. पण, तसे अजिबात नाही. कारण, ते समोरुन वार करत नाहीत, ते मागून वार करतात. पण, काही हरकत नाही. राजकारणात असे पाठीमागचे हल्ले देखील पचवायचे असतात, जे आम्ही पचवतो. अडीच वर्ष झाली या सरकारला आणि अजून अडीच वर्षे जातील, त्यानंतर पुन्हा आम्ही निवडून येणार", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फडणवीसांना गोवा काय आहे ते लवकरच कळेल - संजय राऊत

"देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गोवा जिंकून आले आहेत. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. गोवा काय आहे ते त्यांना लवकरच कळेल. कारण गोवा (Goa) पोर्तुगीज यांना देखील कळला नव्हता, इंग्रजांना देखील कळला नव्हता, त्यानंतर अनेक राजकीय पक्षांना देखील अनेक वर्ष गोवा कळला नाही. त्यामुळे लवकरच माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांना देखील गोवा काय आहे ते कळेल. गोवा जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला असेल. पण त्यांनी प्रयत्न करावे, त्यांनी राजकीय कार्यात स्वतःला वाहून घ्यावे, असंही ते म्हणाले.

राजू शेट्टींनी जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे - राऊत

राजू शेट्टी हे शेतकर्‍यांचे नेते आहेत, त्यांचीही काही प्रश्न असतात, त्यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे, आम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होऊ, कारण शेतकऱ्यांच्या संदर्भात काही धोरणे ही केंद्र सरकारची असतात, त्यामुळे त्यांनी जर असे आंदोलन केले तर आम्ही देखील त्यांच्या पाठीशी राहू, राजू शेट्टी हे झुंजार नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते प्रामाणिकपणे लढत असतात,

विधानसभा अध्यक्ष पदाचा निर्णय जटिल प्रश्न नाहीये - राऊत

विधानसभा अध्यक्ष पदाचा निर्णय जटिल प्रश्न नाहीये. पण, तरी जटिल करण्यात आला आहे. खरं म्हणजे हा विषय इतका जटिल होऊ नये. कारण तो घटनात्मक विषय आहे आणि घटनेनुसार निवडणुका व्हायला पाहिजेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शिफारस केलेली आहे. खरं म्हणजे कायद्याने राज्यपालांना विचारु नये. त्यांना फक्त कळवायचे असते. पण, आमच्यात ती सौजन्य आहे की आम्ही त्यांना विचारत आहोत, असंही ते म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com