Sanjay Raut On Ayodhya Paul Ink Attack: अयोध्या पौळ यांच्यावरील हल्ला म्हणजे डरपोकपणा, समोरासमोर या; संजय राऊत भडकले

Sanjay raut News: कळवा येथील या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त भूमिका घेतली आहे.
Sanjay Raut On  Ayodhya Paul Ink Attack
Sanjay Raut On Ayodhya Paul Ink AttackSaam tv
Published On

Sanjay Raut News: ठाण्यात काल शिंदे गटाच्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेकीची घटना घडली. ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेकीबरोबर त्यांना काही महिलांनी मारहाण देखील केली. कळवा येथील या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. 'अयोध्या पौळ यांच्यावरील हल्ला म्हणजे डरपोकपणा, समोरासमोर या, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अयोध्या पौळ हल्ला प्रकरणावर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. 'मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ज्या पद्धतीने महिलेवर हल्ला झाला. माझा पोलीस आयुक्तांना प्रश्न आहे की, तुमचे पोलीस काय करत आहेत? हीच काय तुमच्या ठाण्यातील महिलांची सुरक्षा,असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

'अयोध्या पौळ यांना फसवून एका कार्यक्रमात बोलावलं. त्यानंतर तिच्यावर हल्ला झाला, या प्रकाराला डरपोकपणा म्हणतात, समोरासमोर या, असा इशारा राऊत यांनी दिला.

Sanjay Raut On  Ayodhya Paul Ink Attack
Maharashtra Cabinet Expansion: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच? भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली

मणिपूर हिंसाचारावर भाष्य करताना राऊत म्हणाले, ' गेल्या तीन महिन्यांपासून या देशातल्या सीमेवरील महत्त्वाचं राज्य मणिपूर हे पूर्णपणे हिंसेच्या आगीमध्ये अडकलेलं आहे. आमदार, त्या त्या राज्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांचा घर जाळण्यात आलं. लोक निर्वासित झाले. हजारो लोकांनी पलायन केलं आहे. गृहमंत्रालयाचे हे अपयश आहे. पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेत जायची आणि शक्तिप्रदर्शन करण्याची जोरात तयारी सुरू आहे. लोक मारले जात आहेत, शंभरच्या हून अधिक उग्रवादी घुसले आहेत, त्याच्यावर गृहमंत्री एक शब्द बोलायला तयार नाहीत'.

Sanjay Raut On  Ayodhya Paul Ink Attack
Maharashtra Political News: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद न देण्याचं आधीच ठरलं होतं; बड्या आमदाराचा गौप्यस्फोट

'काल 100 हून अधिक उग्रवादी घुसले आहेत. सीमेकडून त्यांना अत्याधुनिक शस्त्र पुरवण्यात आलेली आहेत. तुमची चीनशी लढण्याची ताकद नाही म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही. मणीपूरमध्ये घुसलेल्यांना चीनची मदत मिळत आहे. जसा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केला, तसा चीनमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न राऊत यांनी मोदी सरकारला केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com