हिवाळी अधिवेशनास उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली
हिवाळी अधिवेशनास उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह
हिवाळी अधिवेशनास उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे कोरोना पॉझिटिव्हSaam Tv

मुंबई : मुंबईमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मेघे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती यावेळी दिली आहे.

हे देखील पहा-

विधानसभा (Assembly) अधिवेशनासाठी २२ डिसेंबरपासून समीर मेघे (Sameer Meghe) हे सभागृहात हजर होते. यावेळी त्यांनी विधानसभेत इतर आमदार (MLA) आणि मंत्र्यांची भेट घेतली होती. यातून त्यांना इतरांना संसर्ग झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐन हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter session) सभागृहाती एक आमदार कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आढळल्याने सगळ्याच आमदारांची चिंता वाढली आहे.

हिवाळी अधिवेशनास उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह
TET Exam Scam; राज्य परीक्षा परिषदेच्या ‘आयुक्त’पदावर प्रश्नचिन्ह

शिवसेनेचे आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) शुक्रवारी विधान भवनात (Assembly Winter Session) दाखल झाले होते. पण त्यांना कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्याने गेटवरच अडवण्यात आले होते. रिपोर्ट दाखविल्याशिवाय प्रवेश नसल्याचे सांगताच भाई चिडले आणि प्रवेश देण्याचा आग्रह सुरूच ठेवला. शेवटी 'अॅण्टिजेन' करण्याचा पर्याय निवडून त्यानुसार भाईची टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यानंतरच्या काही मिनिटांतच भाईना प्रवेश मिळाला.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com